आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारदान अाज पाेहाेचणार; पण हरभरा खरेदी बुधवारी हाेईल बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अातापर्यंत शासनाचे अादेश अाणि अाता बारदानच्या प्रतिक्षेत असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर साेमवारी बारदान पाेहचण्याची शक्यता अाहे. काेलकात्याहून बारदान (पाेते) भरुन निघालेले ट्रक रविवारी नागपूरपर्यंत पाेहचल्याने साेमवारी खरेदी केंद्रावर खरेदी हाेवू शकणार अाहे. दरम्यान, १३ जूनपर्यंतच खरेदीची मुदत असल्याने शेवटचे दाेन दिवस खरेदी हाेवू शकेल. 


शासनाने तूर खरेदीपाठाेपाठ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ४४०० रूपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्याचे जाहीर केले हाेते. त्यानुसार जिल्ह्यात १२ ठिकाणी हरभरा खरेदीला प्रारंभ झाला हाेता. एप्रिल, मे महिन्यात अातापर्यंत ८१ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात अाली अाहे. त्यापेक्षा अधिक हरभरा शेतकऱ्यांनी नाेंदणी केला असून ताे खरेदी करण्याचा बाकी असताना शासनाने खरेदी बंद केली हाेती. गेल्या अाठवड्यात शासनाने हरभरा खरेदी केंद्रांना १३ जून पर्यंत मुदतवाढ दिली अाहे. या मुदतीमध्ये हरभरा खरेदी हाेवू न शकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदानाची घाेषणा करण्यात अाली अाहे. जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिल्याचे अादेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाले अाहेत. परंतु, केंद्रावर हरभरा ठेवण्यासाठी बारदान नसल्यामुळे खरेदी बंदच ठेवण्यात अाले अाहेत. मुदतवाढ मिळाल्यानंतर मार्केटींग फेडरेशनने काेलकाता येथे बारदानच्या खरेदीची अाॅर्डर दिली हाेती. दरम्यान, काेलकात्याहून निघालेले बारदानचे दाेन ट्रक साेमवारी जळगावात पाेहचणार अाहेत. साेमवारी दिवसर जिल्ह्यातील १२ केंद्रावर या बारदानचा पुरवठा केल्यानंतर मंगळवार अाणि बुधवारी केंद्रावर हरभरा खरेदी हाेवू शकेल. १३ जून राेजी खरेदी केंद्राची मुदतवाढ संपत असल्याने दाेनच दिवस खरेदी हाेवू शकेल. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सातत्याने तालुक्याच्या ठिकाणच्या खरेदी केंद्रावर विचारणा केली जात अाहे. केंद्रावरील नाेंदणीची संख्या पाहता अनेक शेतकऱ्यांना हरभरा खरेदीची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली अाहे. दरम्यान, काेलकात्याहून निघालेले बारदानचे ट्रक नागपूरपर्यंत पाेहचले असून साेमवारी (दि.११) सकाळी जिल्ह्यात पाेहचणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांच्याकडून सांगण्यात अाले. 


कागदपत्रांची पडताळणी हाेणार 
खरेदी केंद्रावर हरभऱ्याची नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा माेजणी न झाल्यास अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १ हजार रूपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घाेषणा शासनाने केली अाहे. जिल्ह्यात केवळ दाेनच दिवस केंद्र सुरू राहणार असल्याने अाता हरभरा माेजणी न झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना अनुदानाच्या रांगेत उभे राहावे लागणार अाहे. अनुदानासाठी कागदपत्रे पडताडणीसह विविध निकषांना शेतकऱ्यांना सामाेरे जावे लागणार अाहे. दरम्यान, हरभऱ्यासाेबत शासनाने तूर खरेदीसाठी नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदानाची शासनाने घाेषणा केली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...