आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा Ground Report: हत्‍याकांडाच्‍या तिस-या दिवशी बहुतांश घरांना कुलूप, गाव सुमसाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर - मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून रविवारी सोलापूर जिल्ह्यातील 5 निर्दोष भिक्षुकांची बेदम मारहाण करीत त्यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर राईनपाडा (ता. साक्री) येथे आरसीपी पथकासह सुमारे 50 ते 60 कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

 

सकाळी 9.30 वाजता दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने राईनपाडा येथे भेट दिली असता सर्वत्र शांतता दिसून आली. बहुतेक घरांना कुलूप तर गावात 3 दिवसांपासून पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांसह पोलिसांचेही हाल झाले. घटनेच्‍या तिसऱ्या दिवशीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. दिव्‍य मराठीच्‍या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतानाही वृद्ध महिला मौन बाळगत होत्या.

 

गावात केवळ 10 पुरूष
गावात एकूण 60 ते 70 महिला व केवळ 10 कर्ते पुरुष आज बुधवारी हत्‍याकांडाच्‍या तिस-या दिवशी दिसून आले. गावातील महिला पुरूषांनी नेहमीप्रमाणे आपली दैनंदिन कामे पूर्ण केली. बहुतांश पुरुष मंडळी गावात नसल्याने दळणवळणासाठी असलेली सर्वच वाहने प्रत्येकाच्या दारापुढे गेल्या तीन दिवसापासून उभीच आहेत.

 

पाण्यासाठी पोलिसांची धाव
गावात गेल्या तीन दिवसांपासून पाणी सोडले जात नसल्याने व पाणी सोडणारे गुलाब चौधरी हे गावातच नसल्याने पोलिसांनी त्यांच्या पत्नीला पाणी सोडण्याची विनंती केली. नंतर पाण्याची टाकी पत्नीने भरली मात्र पाणी सोडण्याचे कौशल्य नसल्याने मोठी तारांबळ उडाली होती. अखेर साडेदहा वाजता मुबलक प्रमाणात पाणी सोडल्याने महिलांनी पाणी भरले व पोलिसांनाही पाणी मिळाले. घटनेच्‍या तिसऱ्या दिवशीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. दिव्‍य मराठीच्‍या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देतानाही वृद्ध महिला मौन बाळगत होत्या.


घटनेमुळे गावाची बदनामी

हत्याकांडाच्या घटनेनंतर गावातील सर्वच पुरुष, महिला इतरत्र निघून गेल्याने राईन पाड्याची बदनामी झाली आहे. पाचही भिक्षुकांना मी वाचविण्यास गेलो असता मलाही नागरिकांनी मारहाण केली. या घटनेतील आरोपींवर कठोर शासन व्हावे. निर्दोषांची सुटका व्हावी

- सखाराम महिपत पवार(भिक्षुकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे माजी पं.स सदस्य )

 

महिला-पुरूष निघून गेल्‍याने वृद्धांचे हाल

आज 3 दिवस उलटूनही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक अद्यापही गावात दिसले नाही. गावातील अनेक महिला व पुरुष गावातून निघून गेल्याने वृद्धांचे हाल होत आहेत. 
5 ते 6 किलोमीटर अंतरावर जंगल असून तेथे हे सर्व निघून गेले असावेत किंवा नातेवाईकांकडे गेले असावेत.

- विश्वास गांगुर्डे (ग्रामपंचायत सदस्य, राईनपाडा)

 

पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या,  तिस-या दिवशी गावात कशी होती परिस्थिती...गावातील महिलांचे काय होते म्‍हणणे...दिव्‍य मराठीचा सविस्‍तर रिपोर्ट.... 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...