आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात मविप्र संस्थेत पाटील-भाेईटे गट भिडले, एकमेकांची डोकी फोडली; पोलिसांचा लाठीमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यालयास कुलूप लावून ताबा घेण्याच्या विषयावरून नरेंद्र पाटील व भाेईटे गट मंगळवारी एकमेकांना भिडले. दाेन्ही गटांत तुंबळ हाणामारी व दगडफेकीत डाेकी फुटली. रस्त्यावरच दगड भिरकावण्यात अाल्याने नागरिकांत दहशत पसरली हाेती. पाेलिसांनी लाठीमार करून दाेन्ही गटाचे संचालक, सदस्य व समर्थकांना पांगवले. 


'मविप्र'प्रकरणी पोलिसांनी दिलेला कलम १४५चा प्रस्ताव तहसीलदार अमोल निकम यांनी १२ जून रोजी फेटाळला. त्यानंतर नरेंद्र पाटील गटाने १७ जून रोजी संस्थेचा ताबा घेतला होता. परंतु, सोमवारी तहसीलदारांनी पुन्हा एक पत्र काढून कोणत्याही संचालक मंडळास ताबा देण्यचे आदेश दिले नसल्याचे म्हटले. त्यामुळ मंगळवारी सकाळी १० वाजेपासून मविप्र कार्यालयाबाहेर तणाव निर्माण झाला होता.


फेर प्रस्तावाचा सल्ला 
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात प्रस्ताव फेटाळला आहे; परंतु त्यातील निष्कर्षांवरुन एका गटाने संस्थेचा ताबा घेतला आहे. आता फेर प्रस्ताव पाठवण्याबद्दल सरकारी वकिलांकडून सल्ला घेत आहोत. 
- सुनील गायकवाड, पोलिस निरीक्षक, जिल्हापेठ 


ताब्याचा वाद न्यायप्रविष्ट 
मविप्र संस्थेचा ताब्याचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे अयोग्य आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावावर कामकाज करून तो फेटाळला आहे. कोणत्याही संचालक मंडळास ताबा देण्याचा उल्लेख केलेला नाही. 
- अमोल निकम, तहसीलदार 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...