आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाची ५ जून रोजी जनसुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या अनुषंगाने जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्य हे ५ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. 


या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे   अध्यक्ष एम. जी. गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य राजाभाऊ करपे, डॉ. भूषण कर्डिले, सुधीर ठाकरे, दत्तात्रय बाळसराफ व सदस्या डॉ. सुवर्णा रावळ यांचा या दौऱ्यात समावेश आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य, सचिव व आयोगाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोगातर्फे जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात विभागावर जनसुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थांमार्फत माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


पुरावे सादर करण्याचे अावाहन 
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या कार्य क्षेत्रामधील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा संबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे, वा आपले म्हणणे मांडावयाचे आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांनी लेखी पुराव्यासह व ऐतिहासिक दस्तऐवज माहितीसह आपले निवेदन जन सुनावणीच्या वेळी आयोगासमोर सादर करावीत, असे राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...