आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्यात घरफोडी करून चोरलेली दुचाकी जळगावात; सुरक्षारक्षकानेच मारला डल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रेल्वेस्थानक परिसरात दोन दिवासांपूर्वी एक दुचाकी बेवारस स्थितीत अाढळून आली होती. शहर पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, गेल्या आठवड्यात जालना येथे ५ लाख ८० हजारांची घरफोडी करून चोरट्याने ही दुचाकी चोरून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, घरमालकाच्या सुरक्षारक्षकानेच ही घरफोडी केल्याचे उघड झाले असून त्याने घरफोडी करून जळगावात अाल्यानंतर रेल्वेने पोबारा केला आहे.  


जालना येथील व्यापारी राजेश पद्माकर जैन यांची जालना येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये सोडियम सिलीकेटची कंपनी अाहे. कंपनीच्याच आवारात त्यांचे घर आहे. १६ एप्रिल रोजी राजेश जैन यांच्या आईचे निधन झाल्याने ते त्याच दिवशी दुपारी परिवारासह नागपूर येथे गेले. कंपनीतील सुरक्षारक्षक दीपक उर्फ दिलीप पटेल (रा. सिंगूर, जि. खंडवा) याच्यावर त्यांनी संपूर्ण कंपनी व घराची जबाबदारी सोपवली होती. पटेल याला कंपनीची आणि घराची संपूर्ण माहिती होती. १७ एप्रिल रोजी दुपारी जैन यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता मोबाइल बंद होता. त्यामुळे जैन यांनी मित्राला फोन करून खात्री करण्यास सांगितले. त्यांनी घरी जावून पाहिले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच सुरक्षारक्षक दीपक देखील दिसला नाही. यानंतर जैन यांनी खात्री केली असता, घरातून रोकड, दागिन्यांसह दुचाकी (असा ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर अाले. जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारपर्यंतही सुरक्षारक्षक दीपक याचा मोबाइल बंद असल्यामुळे त्यानेच घरफोडी करून पोबारा केल्याचा संशय पोलिसांसह जैन यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...