आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: वाणिज्य शाखेत नेहा, विज्ञानमधून जयेश, कलामध्ये सायली प्रथम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात वाणिज्य शाखेच्या मॅथ आणि अकाउंट विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत मूजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा कलंत्री हिने ९६.१५ टक्के, विज्ञान शाखेत जयेश पाटील ९२.९२ टक्के, कला शाखेतून सायली करे हिने ८७.८४ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. जिल्ह्यात मुलांचा ८०.९७ टक्के तर मुलींचा ८८.७३ टक्के निकाल लागला. त्यामुळे यंदादेखील जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे.

 

१२ वीचा अाॅनलाइन निकाल दुपारी जाहीर हाेणार असल्याने सकाळपासून विद्यार्थ्यांची धावपळ पाहण्यास मिळाली. अनेक जण सकाळपासून महाविद्यालयात थांबून हाेते. दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाअाेढ लागली हाेती. या वेळी काहींच्या चेहऱ्यावर अानंद तर काहीच्या चेहऱ्यावर दु:ख पाहण्यास मिळाले. शहरात यंदा देखील मुलींचीच अाघाडी असल्याचे दिसून अाहे. तसेच अनेक महाविद्यालयांनी निकालात यंदादेखील वर्चस्व सिद्ध केले अाहे. यात तिन्ही शाखेत जिल्ह्यातून अाघाडीचे गुण मिळवण्यात मूजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुसंडी मारली. तसेच मूजे महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे अकाउंट विषयात ओम साहित्या, श्वेता जैन, राम सोमाणी, नम्रता कासार, प्रेरणा कुमट, नेहा कलंत्री, वरद पाटील व सरिता जाखड यांनी अकाउंट विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले. शहरात निकालाचा टक्का घसरला असला तरी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. काही विद्यार्थ्यांनी निकाल पाहिल्यानंतर शाळेत जाऊन शिक्षकांच्या भेटी घेत आशीर्वादही घेतले.

 

विभागनिहाय टक्केवारी : विभागनिहाय टक्केवारीमध्ये सुरुवातील जिल्हा नंतर मुलांची टक्केवारी तर कंसात मुलींची टक्केवारी अाहे. नाशिक मुले ८२.६५ % (मुली ९२.०२ %), जळगाव ८०.९७ %, (८८.७३ %), धुळे ८६.६५% (९१.९५ %), नंदुरबार ८२.७१ %, (८७.९४ %), नाशिक विभाग ८२.७ %, (९०.६३ %)
गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठी आजपासून अर्ज : निकालाची घोषणा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी वा छायांकित प्रतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना ३१ मे ते ९ जूनपर्यत शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे. फेर मूल्यांकनासाठी छायांकित प्रत मिळाल्यावर तर श्रेणीसुधार योजनेसाठीही जुलै २०१८ आणि मार्च २०१९ अशा दोन संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 

सर्व्हर डाऊनमुळे अडचण : दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर तासभर सर्व्हर डाऊन होते. एकाच वेळी असंख्य लोकांकडून निकालाची पडताळणी सुरू झाल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.


१०९ कॉपी केसेस जळगावात : बारावीच्या परीक्षेदरम्यान नाशिक विभागात एकूण २२४ कॉपी केसेस शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या. यातील १०९ केसेस जळगाव जिल्ह्यातील आहेत.

 

एमसीव्हीसी निकाल : नूतन मराठा महाविद्यालय ७२ टक्के, बेंडाळे महाविद्यालय ८७ टक्के, मूजे महाविद्यालय ६७.४४ टक्के, विकास तंत्र निकेतन ७५ टक्के, गव्हर्नमेंट टेक्निकल विद्यालय ७७.७७ टक्के.

 

महाविद्यालयांची अशी अाहे टक्केवारी
जी.एस.रायसोनी ज्युनिअर कॉलेज (१०० टक्के), सेंट टेरेसा कॉन्व्हेंट हायर सेकंडरी विद्यालय (१०० टक्के), धनाजी नाना चौधरी ज्युनिअर कॉलेज (९७.९५ टक्के), इकरा शाहीन कॉलेज (९६.६२ टक्के), मूजे महाविद्यालय (९४.९२ टक्के), सिद्धिविनायक विद्यालय (९१.८८ टक्के), छत्रपती शिवाजी विज्ञान ज्युनियर कॉलेज (९४.७९ टक्के), का.ऊ. कोल्हे विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (९१.२ टक्के), आर.आर. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (८९ टक्के), डॉ.शाहीन काजीर उर्दू गर्ल्स ज्युनिअर कॉलेज (८८.३७ टक्के), हाजी नूर मोहम्मद चाचा ज्युनिअर कॉलेज (८६.४० टक्के), बेंडाळे महिला कॉलेज (८६.८६ टक्के), नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (८५.१४ टक्के), कोटील महाजन ज्युनियर कॉलेज (८१ टक्के), अॅड. सीताराम बाहेती आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज (८०.२२ टक्के), मिल्लत हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (८० टक्के), नूतन मराठा महाविद्यालय (७६.९४ टक्के), माध्यमिक विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, मेहरूण (७३.९१ टक्के), महाराणा प्रताप विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (६५.२९ टक्के), जी. प. विद्यानिकेतन अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (२८.१२ टक्के).

बातम्या आणखी आहेत...