आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्यातील मनवेल येथे बारावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन गुरुवारी आत्महत्या केली. शुभांगी भगवान पाटील (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

 

मनेवल येथील रहिवासी शुभांगी भगवान पाटील ही चोपडा येथील महात्मा गांधी विद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेचे शिक्षण घेत होती. बारावीची परीक्षा सुरू असल्याने व शेवटच्या संस्कृतच्या पेपरला अवकाश असल्याने ती गावी मनवेल (ता.यावल) येथे आली होती. गुरूवारी सकाळी ती घरात एकटी होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी घरात जावून पाहिले. या वेळी शुभांगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. अात्महत्येचे कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...