आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: विठ्ठलपेठेतील तरुणाकडून 4,445 रुपयांची दारू जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जुने जळगावातील विठ्ठलपेठेतील तरुणाकडून साडेचार हजार रुपये किमतीची अवैध दारू हस्तगत करण्यात आली आहे. शनिपेठ पोलिसांत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.


विठ्ठलपेठमधील रहिवासी प्रशांत चिंतामण धांडे हा तरुण अवैध दारू घेऊन कालिंका माता चौफुली परिसरात फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी सपाळा रचून कालिंकामाता चौकातील एका हॉटेलच्या अाडोशाला हा तरुण उभा होता. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून ४ हजार ४४५ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...