आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये तरूणाचा मृत्‍यू; घातपाताच्‍या आरोपानंतर पोलिस पाटलांसह 14 जणांवर गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंटू भगवान अडकमोल (39) यांच्‍यासोबत घातपात झाल्‍याचा संशय कुटुंबीयांनी व्‍यक्‍त केला आहे. - Divya Marathi
पिंटू भगवान अडकमोल (39) यांच्‍यासोबत घातपात झाल्‍याचा संशय कुटुंबीयांनी व्‍यक्‍त केला आहे.

 यावल- येथील विरवाली रस्‍त्‍यावर रविवारी रात्री पिंटू भगवाण अडमोल या 39 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळूण आला होता. घातपाताचा आरोप करत संशयीतावर गुन्‍हा दाखल करण्‍यासाठी कुटूंबीयांनी मृतदेहासह यावल पोलिस ठाण्‍यात ठिय्या मारला होता. यानंतर पोलिसांनी गावातील पोलीस पाटलांसह 14 जणांविरोधात गुन्‍हा  नोंदवला  आहे.  


यावल तालूक्‍यातील मोहराळा येथील रहिवाशी पिंटू भगवान अडकमोल यांचा विरवली रस्‍त्‍यावर मृतदेह आढळून आला होता. ते दुचाकी क्र.  एम.एच. १९ ए.एस. ५३६७ वरून गावाकडे येत होते. त्‍यांचे वडील भगवान बालू अडकमोल यांनी घातपाताचा संशय व्‍यक्‍त करीत चौकशीची मागणी केली होती. आरोपानंतर मृतदेहाचे इंनकॅमेरा शवच्‍छेदन करण्‍यात आले. शवच्‍छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदे‍हासह यावल पोलिस ठाण्‍यात ठिय्यादेत आरोपींविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी केली होती. भगवान बालु अडकमोल यांच्या तक्ररीवरूण पोलिसांनी मोहराळे येथील वासुदेव मुरलीधर पाटील, युवराज जयसिंग पाटील ( पोलिस पाटील ), धनराज जयसिंग पाटील, सुनिल रामसिंग पाटील, प्रविण रामसिंग पाटील, शशीकांत राजाराम महाजन, भरत शशीकांत महाजन, राजेद्र भावडू महाजन, तुळशिदास शिवराम मोरे, सोपान शिवराम मोरे, लहु रामु पाटील, सोपान रामु पाटील, शामराव अशोक पाटील व सुकलाल गणपत पाटील यांच्या विरूध्द अॅट्रासिटी सह कट रचने व खुन करणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पाेलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, सहाय्यक फौजदार सजंय पाटील, संजय तायडे करीत आहे.


काय आहे प्रकरण... 
पिंटू अडकमोल याची पत्नी लताबाई ही येथील ग्रामपंचायत सदस्य आहे. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कंपाऊंड वॉलच्‍या कामासाठी ग्रामपंचायतीच्‍या वतीने खोदकाम करण्‍यात आले होते. यावरून ६ जानेवारीला वरील १४ संशयीत आणि मयत पिंटू अडकमोल यांचा वाद झाला होता. वादानंतर संशयीतांनी त्‍यांना जीवे मारण्‍याची धमकी दिली होती.

 

हेही वाचा,
घातपात झाल्‍याचा कुटुंबीयांचा आरोप

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...