आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्पदंशाने मृत विद्यार्थिनीच्या घरामधूनच दुसऱ्या दिवशी सर्पमित्राने काढला इंडियन काेब्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शाळेत जाण्याच्या अर्ध्या तासापूर्वी घराबाहेर तारेच्या कंपाउंडवरुन वाळत घातलेली ओढणी काढताना कावेरी तीरमले या विद्यार्थिनीचा बुधवारी मृत्यू झाला होता. तर कावेरीला चावा घेणारा साप घरातच कोब्याच्या खाली गेला होता. गुरूवारी सकाळी १० वाजता सर्पमित्र वासुदेव वाढे यांनी घरातील कोबा फोडून त्या खालून हा साप काढला. इंडियन कोब्रा जातीचा हा साप असून ताे अतिषय विषारी आहे. याच सापाच्या दंशाने कावेरीचा मृत्यू झाला. 


कोवरीच्या लक्षात न आल्यामुळे तीच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाहीत. तीन वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन देखील कुटुंबियांना अपयश आल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तीरमले यांच्या झोपडी वजा घराजवळ अडगळीची जागा होती. तेथे उंदरांचा उच्छाद असल्यामुळे त्यांना खाण्यासाठी साप ही आकर्षित होत असतात. याच शक्यतेवर गुरूवारी वाढे यांनी कोबा फोडून सापाला शोधले. 


शहरातील सर्पमित्र 
घराजवळ साप आढळून आल्यास किंवा दुर्दैवाने कुणास सर्पदंश झाला तर सर्प मित्रांना संपर्क करावा. बाळकृष्ण देवरे ९०२३८०८३६५, वासुदेव वाढे ९६७३९७०९८०, रवींद्र सोनवणे ९९२२७ ७४७१५, ऋषी राजपूत ८०५५३९३९८९, शुभम पवार ८४८५८२३३२९, जगदीश बैरागी ९४२०६ ६२५३१, चेतन भावसार ९८९०६५३५९५, नीलेश ढाकणे ७९७२६७३८४१, राजेश सोनवणे ८३०८७८८१८४, अमोल देशमुख ९०२९७ ९१३९६ 


अशी घ्या काळजी 
- घराजवळ अडगळीची जागा असल्यास सफाई करून घ्यावी. 
- खरकटे अन्न घराजवळ टाकू नये. हे अन्न खाण्यासाठी येणाऱ्या उंदरांना भक्ष्य करण्यासाठी सापही येतात. 
- घर, अंगणातील उंदरांची बिळे नष्ट करावीत. 
- ड्रेनेज, बाथरूमच्या पाइपांना जाळी बसवून घ्यावी. 
- घरावर, खिडकीवर वाढलेल्या अनावश्यक वेली काढून घ्याव्यात. 
- परिसरात स्वच्छता ठेवल्यास उंदिर तसेच साप यांचा वावर बंद होताे. 

बातम्या आणखी आहेत...