आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिका कार व दुचाकीच्‍या समोरा-समोर झालेल्‍या धडकेत तीघे जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- इंडीका कार व दुचाकीच्‍या समोरा-समोर झालेल्या झालेल्‍या धडकेत दुचाकीवरील तीघे जण जखमी झाले. यावल तालुक्यातील साकळी येथे गुरूवारी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. यात एकाची प्रकृती गंभीर असुन त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.


याविषयी अधिक माहिती अशी की, विजय प्रकाश महाले ( वय ३५ रा. दुसखेडा ता. यावल ) हे दुचाकी वरून पत्नी सपना महाले ( वय २८ ) व मुलगा चेतन ( वय ८ )  यांच्या सह चोपड्या कडून यावल कडे येत होते. दरम्यान साकळी येथील बसस्थानकाजवळील पुलावर यावल कडून चोपड्या कडे जाणारी इंडीका कार क्रमांक एम. एच. १८ एस. १७२८ यांच्या थेट समोरा-समोर धडक झाली. यात दुचाकी वरील विजय महाले यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले तर त्यांच्या पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच 108 रूग्णवाहिकेतील डॉ. उमेश कवडीवाले, अरूण कोळंबे, चंद्रकांत ढोके हे घटनास्थळी पोहोचले होते. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इंडीका चालक अपघाता नंतर वाहन सोडून पसार झाला होता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...