आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न मंडपात शॉक लागून 10 वर्षीय नेहाचा मृत्यू; मृत मुलीच्या आईने वाचवले दोघांचे प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- तालुक्यातील लासुर येथील इंदिरा नगर मधील रहिवाशी नेहा शरद पाटील (10) हिचा लग्नाचा मंडपात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काल (गुरुवार) सायंकाळी घडली.

 

लासुर गावात रामचंद्र पांडुरंग माळी यांचा मुलगा शरद माळी यांचे लग्न होते. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना नेहा ही मंडपात खेळत असताना अचानक तिचा हात मंडपाच्या खांबला लागला. ती लांब फेकली गेली. तिला तातडीने लासुर येथील खासगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. नंतर तिला चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

 

नेहाच्या आईने वाचवले दोन मुलांचे प्राण...

लग्न मडपात एकूण चार ते पाच जणांना विजेचा शॉक बसले. मृत नेहाची आई सरला पाटील यांनी अन्य दोन मुलींचे प्राण वाचवले. मात्र, दुर्देवाने पोटच्या मुलगी नेहा वाचू शकली नाही.

 

शेतकरी कटुंबब दोनच मुली...

मृत नेहा ही शेतकरी कुटूंबातील असून वडील शरद पाटील हे काबाड कष्ट करून आपला संसारचा गाडा हाकतात. नेहाला एक थोरली बहीण (प्रियांका) आहे. ती कन्या शाळेत सहावीत शिक्षण घेत आहे.

 

मुलगी गेल्याची वार्ता कळताच आईने शुद्ध हरपली...

नेहाच्या मृत्यूची वार्ता कळताच सरला पाटील यांनी शुद्ध हरपली. त्यांना देखील चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

नेहाला शॉक लागला हे आईला माहीतच नव्हते...

चोपडा येथील ओम एकनाथ सौंदाने (12) या मुलासह दोघांनाही शॉक लागला होता. या दोघांना सरला पाटील यांनी वाचविले. परंतु पोटच्या मुलीलाही शॉक लागला, हे त्यांना माहीतच नव्हते.

बातम्या आणखी आहेत...