आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा- तालुक्यातील सुटकार येथील तरुण आणि जळगाव येथील एम.जे कॉलेजचा एसवाय बीएस्सीचा विद्यार्थी प्रदीप युवराज ठाकरे (वय-21) याने आशा बाबा नगर, जळगाव येथे याठिकाणी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


प्रदीप ठाकरे हा दोन वर्षापासून एमजे कॉलेज येते शिक्षणासाठी रूम करून आपल्या मित्रा सोबत गणेश कॉलनी परिसरात राहत होता. गुरुवारी (ता.15) रात्री अकरा वाजता मित्राना न सांगता घराबाहेर निघून गेला होता. तो हरवल्याची नोंद त्याच्या मित्रांनी जिल्हा पेठ पोलिसांनी दीड वाजता दिली होती. त्यानंतर पोलिसांना पहाटे आशा बाबा नगरमधील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आला. 

 

मयत प्रदीप ठाकरे यांचे वडील युवराज जगन ठाकरे हे चोपडा परिवहन महामंडळात बसचालक म्हणून नोकरीला असून त्याच्या पच्यात आई,वडील,एक बहीण,एक लहान भाऊ असा परिवार आहे. प्रदीपवर दुपारी अडीच वाजता सुटकार गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. रामानंद पोलिस स्टेशन, जळगाव या ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...