आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • जळगावात 9 वर्षीय चिमुरडीचा विवस्रावस्थेत‍ मृतदेह सापडला, अत्याचाराचा संशय 9 Years Old Girl Dead Found In Jalgaon Samata Nagar

जळगावात 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावमध्ये एका ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शहरातील समतानगर परिसरात धामणगाव वाडा भागात राहणारी ही मुलगी सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. पोत्यात बांधून ठेवलेला तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका टेकडीवर आढळून आला आहे.    


घटनास्थळावर सापडलेल्या वस्तूंमध्ये काडीपेटीचे कव्हर आणि मृतदेहाच्या पायावर जाळल्याच्या खुणा आढळल्यामुळे हत्या केल्यानंतर चिमुकलीस जाळण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय आहे.  दरम्यान, प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल राखीव ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.   


पीडित पूजा (नाव बदललेले) ही नूतन मराठा विद्यालयात यंदा चाैथीच्या वर्गात शिक्षण घेणार हाेती. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ती घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला. परिसरातील एका मशिदीतून घोषणा करून पूजा हरवल्याची माहिती प्रसारित केली. यानंतर रात्रभर   संपूर्ण परिसर पिंजून काढून तिचा शोध घेण्यात अाला. याचदरम्यान रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारही देण्यात आली होती.  त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सकाळी ६ वाजेपर्यंत कुटुंबीय, नागरिकांनी पूजाचा शोध घेतला. मात्र, तिचा काहीच पत्ता लागला नाही.  

 

कुत्र्यांनी तोडले लचके  
सकाळी ७ वाजता याच परिसरात राहणाऱ्या रेखाबाई संजय सोनवणे या बकऱ्या चारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. घरासमोरील टेकडीवर एका पोत्याजवळ काही कुत्री व डुकरे जमा झालेली त्यांनी पाहिली. कुत्री या पोत्याचे लचके तोडत असल्याचे पाहून त्या भांबावल्या. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पोत्यात एक लहान मूल असल्याचे दिसून अाले. हे चित्र पाहून रेखाबाई यांना धक्का बसला. दरम्यान, रात्री आपल्या परिसरातून पूजा बेपत्ता झाल्याचे त्यांना माहीत होते. पोत्यात पूजाचा मृतदेह असावा, असा संशय आल्यामुळे त्यांनी थेट पूजाच्या घरी जाऊन माहिती दिली. पूजाची आई व  परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहाेचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटताच हंबरडा फोडला.  याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

हात ओरबाडलेले, मांडी आणि गुडघ्यावर जखमा  
एका मोठ्या पोत्यात पूजाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत बांधला होता. तिच्या डाव्या मांडी व गुडघ्यावर जखमा होत्या. डावी मांडी जाळण्याचा प्रयत्न केलेला होता. दोन्ही हातांवर अोरबाडल्याच्या खुणा होत्या. ओठ व नाक दाबल्यामुळे लाल झाले होते. पोत्याचे तोंड एका बारीक दोरीने बांधून बंद केले होते, तर पोत्यात एक काडीपेटीचे कव्हरही आढळून आले आहे. पोलिसांच्या श्वानास काडीपेटीच्या कव्हरचा वास दिल्यानंतर २० मिनिटे ते याच परिसरात घुटमळले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..संबंधित घटनेचे फोटो...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...