आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर- प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडचा सराव करताना भोवळ येऊन पडल्याने हवाई दलातील जवान मयूर अशोक पाटील (वय-32, रा. नवापूर, जि.नंदुरबार) यांचा गुरूवारी सायंकाळी बडाेद्यात (गुजरात) मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयूर यांची 7 महिन्यांची गराेदर पत्नी पूजा पाटील यांनी अक्षरश: हंबरडा फाेडला होता. ‘माझ्या कपाळावरचे कुंकू पुसू नका, बांगड्या फोडू नका, मयूर जिवंत आहेत. मयूर तुम्हाला आपल्या बाळाला पाहायचे नाही का,’ असे त्या म्हणत होत्या.
गुरुवारी (ता.18) बडाेद्यातील परेडचा सराव संपल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलटी झाली तसेच भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळले व बेशुद्ध झाले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती रात्री उशीरा नवापूर येथे राहणाऱ्या मयूर पाटील यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. ते तातडीने बडोद्याला रवाना झाले. शुक्रवारी दुपारी चार वाजता मयूर यांचे पार्थिव नवापूर येथे अाणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
जन्माअाधीच बाळाचे पितृछत्र हरपले
मयूर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी पूजा पाटील गर्भवती आहे. दोन महिन्यांत त्यांच्या घरी नवीन बाळ जन्माला येणार आहे. बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच क्रुर काळाने मयूर यांच्यावर झडप घातली. मयूर पाटील यांचे वडील वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
अनेक ठिकाणी बजावले कर्तव्य
मयूर पाटील 2005 मध्ये हवाई दलात दाखल झाले होते. त्यांनी राजस्थान-जयपूर, जम्मू-श्रीनगर, राजस्थान-जोधपूर, वडनगर (गुजरात), बडोदा (गुजरात) याठिकणी आपले देशासाठी कर्तव्य बजावले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून व्हिडिओ आणि फोटोंमधून पाहा...जवान मयूर यांच्या पत्नी आणि कुटुंबियांचा आक्रोश...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.