आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगर नगर पंचायतीत भाजपची सत्ता; खडसेंनी राखले वर्चस्व, शिवसेनेला तीन जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपची सरशी झाली. लोकनियुक्त नगराध्यक्ष   आणि  १७ पैकी १३ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले तर शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. प्रतिष्ठेच्या  या निवडणुकीत  राष्ट्रवादी आणि स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. भाजपने नगराध्यक्षपदासह १४ जागांवर विजय मिळवला. मात्र, जामनेर नगरपालिकेतील १०० टक्के यशाची पुनरावृत्ती माजी मंत्री खडसे यांना साधता आली नाही.     


नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. भाजप विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत मोट बांधून आघाडी तयार केली, तर काँग्रेस मात्र स्वबळावर मैदानात उतरली. नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी भाजपने सर्व जागांवर, तर काँग्रेसने ७ जागांवर उमेदवार दिले. शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीने १५ जागांवर उमेदवार दिले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपची सर्व यंत्रणा कामाला लागली होती, तर शिवसेनेचा किल्ला चंद्रकांत पाटील यांनी लढवला. शुक्रवारी (दि.२०) तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपला १३, शिवसेनेला ३ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी आघाडी व काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.

 

नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजय उमेदवार व कंसात मिळालेली मते अशी...
प्रभाग 1: संतोष कोळी- भाजप (246), प्रभाग 2: शबनबी या आरिफ- भाजप (389), नुसरत खान अपक्ष (333), प्रभाग 4- बिलकस आमनुनाह- भाजप (324), प्रभाग 5- शमीन अहमद खान - भाजप (324), प्रभाग 6- मुकेश वानखेडे भाजप( 435), प्रभाग 7- पियुष मोरे- भाजप (400),  प्रभाग 8- साधना संसारे - भाजप( 579), प्रभाग 9- बागवान बिलकीस बी- भाजप (294), प्रभाग 10 - खाटीक शेख - भाजप (238), प्रभाग 11- शेख मस्तान- भाजप (362), प्रभाग 12- संतोष मराठे- शिवसेना (411), प्रभाग 13- कुंदा अनिल पाटील- भाजप (609), प्रभाग 14- सविता बलबले - शिवसेना (405), प्रभाग 15- निलेश शिरसाट- भाजप (338), प्रभाग 16 - मनीषा पाटील भाजप, प्रभाग 17- राजेंद्र हिवरले- शिवसेना.

 

नगराध्यक्षपदासाठीची चूरस
नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या नजमा तडवी यांचा 1175 मतांनी विजय झाला.  मतमोजणी दरम्यान नगराध्यक्षपदाच्या लढतीत मतांचा चढउतार सुरु असल्याने उत्कंठा वाढली होती. अखेर तडवीयांनी विजय खेचून आणला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...