आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर पालिकेत भाजपचा डंका, गिरीश महाजनांच्या तंत्रकाैशल्याच्या बळावर आघाडीचा सफाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जामनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन या 8 हजार 418 मतांनी विजयी झाल्या. एवढेच नव्हे, तर नगरसेवकांच्या 24 जागांवरही भाजपचाच झेंडा फडकला. यापैकी 2 जागा बिनविराेध झाल्या हाेत्या.

 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपला हा एकहाती विजय मिळाला. राष्ट्रवादी-काॅग्रेस अाघाडीच्या प्रा.अंजली पवार यांना नगराध्यक्षपदाच्या लढतीत दारूण पराभव पत्करावा लागला. एकाही राज्य व केंद्रस्तरीय बड्या नेत्याची सभा न घेता केवळ मंत्री गिरीश महाजन यांच्या तंत्रकाैशल्याच्या बळावर भाजपने हा विजय मिळवला.

 

एकनाथ खडसेंच्या मतदार संघात भाजपचा पराभव
सावदा नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अल्लाबक्ष नजीर शेख विजयी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...   संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...