आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमधील भुसावळ नाक्यावर मालवाहू मिनी टेम्पो उलटला; पाच जखमी, चौघांची प्रकृती चिंताजनक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- शहरातील भुसावळ नाक्याजवळ मालवाहू मिनी टेम्पो उलटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास झाला.


यावल शहराच्या बाहेर असलेल्या भुसावळ नाक्यावरील वळणावर मिनी टेम्पो (क्र.एमएच 19 बी एम 4541) वळणावरून शहराकडे येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघातात चालक नजमोद्दीन जैनोद्दीन तडवी (वय-23, रा. तडवी कॉलनी), शंकर गणेश कोळी (वय-25), आकाश विनोद सोनवणे (वय -21), हर्षल समाधान कोळी (वय- 17,  तिघे रा. निमगाव, ता.यावल) आणि शेख रऊफ शेख अब्दुल्ला मन्यार (वय-  75, रा. मन्यार वाडा) असे पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. शबाना तडवी, डॉ. उमेश कवडीवाले, आरती कोल्हे, अनिता फेगडे, चंद्रकांत ठोके आदींनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

अपघाताची माहिती मिळताच येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..अपघाताची फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...