आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप ग्रृपधारक सावधान! महिलांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हॉट्सअप टाकणार्‍याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. तालुक्यातील साकळी येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.

 

साकळी येथे एकाने त्याच्याच धर्मातील महिलांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने समाज बांधव संतप्त झाले आहेत. 'मॉ-बाप की दुवा' या ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरूद्ध आज (शनिवारी) येथील पोलिस स्टेशनला धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल मोबीन शेख मुसा असे संशयीत आरोपीचे नाव आहे. नुमानखान यसुफखान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुक्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याचे हे पहिले प्रकरण आहे. या प्रकरणामुळे व्हॉट्सअॅप गृप धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. या प्रकारामुळे समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारची पोस्ट टाकल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपनिरिक्षक अशोक अहिरे, हवालदार संजय तायडे करीत आहेत.

 

व्हॉट्सअॅप ग्रृपधारक सावधान!
यावलमध्ये व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...