आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका..यावल येथे नरेंद्र मोदींच्या \'अच्छे दिन\'ची काँग्रेसने उडवली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (शनिवार) फैजपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अच्छे दिन'च्या केलेल्या वाद्यांची खिल्ली उडवत केंद्र व राज्य शासनाचे विरोधात घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता आलेल्या वाहनधारकांना गुलाब   पुष्प देऊन तसेच साखर वाटप करून शासनाच्या दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.

 

जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेता तथा यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी अकरा वाजता फैजपूर रस्त्यावरील सुभानी पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभाकर सोनवणे यांनी केंद्र व राज्य शासनाकडून पेट्रोल 86 रुपये 27 पैसे तर 72 रुपये 73 पैसे डिझेलच्या दराने आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अच्छे दिन'चे स्वप्न सर्वसामान्य नागरिकांना दाखवले होते. प्रचंड प्रमाणात दरवाढ झालेल्या पेट्रोल व डिझेलमुळे अप्रत्यक्षपणे इतर सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच शेती मशागत ही महाग झाली आहे. या 'अच्छे दिन'चा आम्ही काँग्रेसकडून व नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध करतो, अशा घोषणा देत काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला" यावेळी पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन व साखर वाटप करून गांधीगिरी काँग्रेसकडून करण्यात आली.

 

काँग्रेसचे शहर अध्यक्ष कदीर खान, नगरसेवक शेख असलम , हाजी गफ्फार शाह, मनोहर सोनवणे, प्रवीण घोडके, भगतसिंग पाटील, बशीर मोमीन, शेख युनूस, समाधान पाटील, जलील पटेल, अनिल जंजाळे, विवेक सोनार, सुशील फेगडे ,पराग धानोरे, मोहम्मद वसीम, जयेश चोपडे, निसार खान, लीलाधर सोनवणे, युवराज पाटील, समाधान महाजनसह मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर  ‍क्लिल करून पाहा... काँग्रेसच्या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ...   

 

बातम्या आणखी आहेत...