आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी इन्कम टॅक्स ऑफिसरची काढली छेड; धुळ्यात काँग्रेस नेत्यासह 300 जणांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- छापेमारीच्या कारवाई दरम्यान प्राप्तीकर विभागाच्या महिला अधिकार्‍याची छेड काढल्याप्रकरणी शिरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्यासह 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. धुळ्यात जिल्ह्यातील शिरपूर पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे.

 

शिरपूरमध्ये झालेल्या या घटनेने धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्राप्तकर विभागाने धुळे शहरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच शिरपूरमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य अमरीश पटेल यांच्याकडे तपासणी केली होती.

 

शासकीय कारवाईत आणला अडथळा...
शिरपूरमधील प्रभाकर चव्हाण यांच्या निवासस्थानी प्राप्तकर विभागाचे एक पथक 17 जानेवारी गेले असता त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला. शासकीय कारवाईत अडथळा निर्माण केला. इतकेच नाही तर पथकातील महिला अधिकारीचा विनयभंग केला. यावेळी चव्हाण यांनी देखील त्यांच्या समर्थकांना चिथावणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जॅकेट घातलेल्या एका व्यक्तीने काही फाईल्स घेऊन पलायन केल्याचे पथकाने सांगितले.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...