आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र-गुजरातची सीमा भूकंपाने हादरली, नवापूर शहरात भिंतीला गेले तडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुंकपामुळे नवापूरमध्‍ये भिंतीला असे तडे गेले होते. - Divya Marathi
भुंकपामुळे नवापूरमध्‍ये भिंतीला असे तडे गेले होते.

नवापूर (जि. नंदुरबार) - नवापूरसह गुजरातेतील तापी जिल्ह्यातील उच्छल, वालोड भागातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भूकंपाचे साैम्य धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र भरूच येथे होते. भूकंपाची ४.६ रिक्टर स्केल इतकी नोंद करण्यात आली. दरम्यान, भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.  


नवापूर, नंदुरबार शहरासह गुजरातच्या सीमावर्ती भागातील अनेक भागात शनिवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जावणले. नंदुरबार व परिसरात ४ वाजून ५२ ते ५६ मिनिटांदरम्यान हे धक्के जाणवले. नवापूर तालुक्यातील काळंबा गावातील माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे यांचे पुत्र अविनाश बिऱ्हाडे यांच्या घराच्या भिंतीला या भूकंपामुळे तडा गेल्याचे सांगण्यात आले.

 

भूकंपाची जाणीव होताच अनेकांनी एकमेकांना विचारणा केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. भूकंपाचे केंद्रबिंदू गुजरातमधील भरूच येथे असल्याचे गांधीनगर येथील भूकंप नोंद केंद्रातर्फे सांगण्यात आले. तेथे ४.६ रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत एकूण नऊ ठिकाणी भूकंप नोंदणी केंद्र आहे. त्यात सावळदा (ता. शहादा) येथेही केंद्र आहे. पूर्वी तेथे नोंदी घेतल्या जात होत्या. आता सर्व नऊ केंद्रांच्या नोंदी या गांधीनगर येथे घेतल्या जातात. 

 
दरम्यान, जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता फारशी नव्हती. केवळ सौम्य धक्के जाणवले. नंदुरबार, नवापूरसह सर्व तहसीलदारांना याबाबत माहिती घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एम. कलशेट्टी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...