आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’त उत्तर महाराष्ट्राला दमडीही नाही! एकनाथ खडसेंची सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- मॅग्नेटिक महाराष्ट्र  होत असल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. मात्र, त्यातील १५ लाख कोटींपैकी उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचादेखील प्रकल्प नाही. मात्र, हा अन्याय उत्तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. माझी नाळ जनतेशी जुळली आहे, असे सांगत भाजप नेते  एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली.  अमळनेर तालुक्यातील लोण सीम गावात एका कार्यक्रमासाठी ते आले होते त्या वेळी ते बोलत होते.  

 
भूखंड घाेटाळ्यात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर अापल्याच सरकारवर नाराज असलेले खडसे फडणवीस सरकारवर टीकेची एकही संधी साेडत नाहीत. नुकत्याच झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही गुंतवणूक मिळालेली नसल्याचे सांगत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 


ते म्हणाले, गेल्या ४० वर्षांत अमळनेरसह बोदवड आणि मुक्ताईनगर तालुके पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत. तरीही अद्याप टंचाईग्रस्त आहे ही शोकांतिका आहे.  गेली ४० वर्षे राजकारणात आहे. माझ्यावर झालेला अन्याय जनतेला माहिती आहे. मी दोषी असेल तर सरकार मला का तुरुंगात टाकत नाही? मी असे काय पाप केले आहे आणि पक्षाचे इतके वाईट केले आहे?,’ असा प्रश्न खडसेंनी केला.

 

माझ्यावर झालेला अन्याय जनतेला मा‍हीत..

गेली 40 वर्षे राजकारणात आहे. माझ्यावर झालेला अन्याय जनतेला माहीत आहे. मी दोषी असेल तर सरकार मला का तुरुंगात टाकत नाही. असे मी काय पाप केले आहे. आणि पक्षाचे इतके वाईट केले आहे. माझ्यावर कसा अन्याय होत आहे. तो जनतेला माहिती आहे. प्रकल्प होत नाही कारखाने होत नाही पाणी मिळत नाही अशी आजची अवस्था झाली आहे.

 

पाय आता चाटणारे कुठे आहेत?

मला माहिती आहे माझ्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी येऊ नये यासाठी काहींनी फोन केले. करू द्या फोन जिवाभावाची मंडळी असतांना मी तुमच्या भरवशावर आहे. तरीही प्रामाणिक आले. एकीकडे पाय चाटणारे आज कुठे आहेत. हे तुम्हाला माहिती आहे. अमळनेर तालुक्यात आज काय स्थिती आहे. खंडण्या गोळा करा, अधिकार्यांना मारा असे प्रकार होत आहेत. अमळनेरचे भुसावळ होत आहे हे दुर्दैव आहे.

 

यावेळी खासदार ए.टी.पाटील, आमदार शिरीष, माजी आमदार डॉ बी एस पाटील, पंचायत समिती सभापती शाम अहिरे, जेष्ठ नेते सुभाष चौधरी, अंकिता पाटील, सुरेखा पवार, लालचंद सैनानी, शामदास लुल्ला, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, नगाव येथील महेश पाटील, भरतसिंग पाटील, हरचंद लांडगे, बापू हिंदुजा, कैलास भावसार, बाजार समिती संचालक विश्वास पाटील, यांच्यासह अमळनेर शहरातील व पंचक्रोशीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

लोण सीमच्या सरपंच अंकिता पाटील यांनी प्रास्ताविक केले तर खासदार ए.टी.पाटील, आमदार शिरीष चौधरी माजी आमदार डॉ बी.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी केले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...