आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, त्यांचे पती अनीश दमानियांसह इतर ६ अज्ञात आरोपींविरुद्ध माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडसेंंना अडकवण्यासाठी त्यांच्या टेबलवर नोटा ठेवण्याबाबत अंजली दमानिया यांनी मला सांगितले होते, असा गौप्यस्फोट अण्णा हजारे यांच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला हाेता. त्या अनुषंगाने खडसे यांनी पाेलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले अाहे की, आरोपींनी कल्पना इनामदार यांच्यामार्फत मुंबईतील कार्यालयात मी हजर नसताना काही पैसे व फाइल टेबलावर ठेवून नंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांना घेऊन मला अडकवण्याचा कट रचला. 

 

सूत्रांनुसार, अंजली अनिश दमानिया व अनिश दिनेश दमानिया तसेच सहा ते सात अज्ञात आरोपींनी 11 एप्रिल 2018 च्या पूर्वी मुंबई येथे दमानियांच्या राहात्या घरी व माजी मंत्री खडसे यांचे मुक्ताईनगर व मुंबई येथील कार्यालयात अंजली दमानिया, अनिश दमानिया व इतर सहा ते सात अज्ञात आरोपींनी संगनमताने कल्पना इनामदार यांच्यामार्फत आमदार खडसे यांचे मुक्ताईनगर व मुंबई येथील कार्यालयात खडसे कार्यालयात हजर नसताना आरोपीतांनी काही पैसे व फाईल टेबलावर ठेवून नंतर लाच लुचपत अधिकाऱ्यांसह अनधिकृतपणे खडसे यांचे ऑफिस मध्ये घुसुन लाच घेतली असे दर्शविण्याचा प्रयत्न केला. खडसे यांचे सरकारी कामात अडथळा आणुन आरोपीतांनी संगनताने कट रचला म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे रा. कोथळी ता. मुक्ताईनगर यांचे फिर्यादीवरुन गुरुवारी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अंजली दमानिया , अनिश दमानिया व इतर सहा ते सात सर्व रा. सांताक्रूझ मुंबई यांचेविरूद्ध भाग 5, गुन्हा रजिष्टर नं 68/2018 , भादवि कलम 451, 452 (अधिकार नसतांना विना परवानगी कार्यालयात घुसणे), 149 (संगनमत करुन एकत्रित जमणे), 116 (अपराध घडले नसतांना चिथावणी देणे) , 120 (ब) (कट कारस्थान रचणे), 186 (सरकारी कामात अडथळा) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक अशोक कडलग हे करीत आहे.

 

गुन्हा दाखल केल्यानंतर खडसेंनी पत्रकारांशी साधला संवाद-

"तथाकथित समाजसेविका अंजली दमानिया यांनी माझे विरुद्ध  कटकारस्थान करुन  बेचुट आरोप केलेले आगे संपूर्ण घटनेची चौकशी सह हे षडयंत्र दमानिया यांनी कोणाच्या सुचनेवरुन केले याची ही चौकशी व्हावी. तीन दिवसा आधी त्यांनी केलेले आवाहन स्विकारुन व त्यांच्या विनंतीला मान देवून त्यांचेविरुद्ध अब्रूनुकसानीची नोटीस पाठविलेली आहे. दमानिया यांनी केलेल्या आरोपा पैकी अंगारीका बिल्डर्स चे पाच कोटी अजुनही माझ्या खात्यावर आलेले नाही असा टोलाही त्यांनी हाणला. याप्रकरणी मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली असुन याची वरीष्ठ पातळीवरुन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याला दिलेले असल्याचे खडसेंनी सांगितले. पोलिस ठाण्यात उपस्थित डी वाय एस पी सुभाष नेवे व पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांना अंजली दमानियांविरूध्दची लेखी तक्रार व कल्पना इनामदार यांनी दिलेल्या मुलाखतीची सीडी पुरावा म्हणून दिलेली आहे." यावेळी खडसे यांचे जिल्हा बॅंक अध्यक्षा ॲड.रोहीणी खडसे, प्रा.सुनील नेवे यांचेसह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... एकनाथ खडसे यांचा पत्रकारांशी संवाद साधतानाचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...