आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक अकाउंटवरून यावलात महिलेची बदनामी, कॅलिफोर्निया कार्यालयाच्या मदतीने आरोपीस बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून महिलेचे छायाचित्र टाकून अश्लील कमेंट करणे एका उपद्रवीला चांगलेच महागात पडले. आपणास पकडणार कोण, असा संबंधिताचा समज होता. मात्र, यावल पोलिसांनी जिल्हा सायबर सेलची मदत घेऊन थेट फेसबुकच्या अमेरिका येथील कॅलिफोर्नियातील कार्यालयातून माहिती मिळवत यावल पोलिसांनी संशयितास शुक्रवारी रात्री बेड्या ठोकण्यात आल्या. रत्नदीप भीमराव ससाणे (रा.जांभुळधाबा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे.  


फैजपूर येथील रहिवासी २८ वर्षीय विवाहितेने फैजपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एका अज्ञात व्यक्तीने २८ मे २०१७ ते ७ जून २०१८ आणि १७ जून ते २४ जून २०१८ या कालावधीत तिच्या नावने फेसबुकवर बनावट अकाउंट उघडले. या अकाउंटवर महिला व तिच्या पतीचे छायाचित्र टाकून  त्यावर अश्लील कमेंट टाकून बदनामी केली. या फिर्यादीनंतर फैजपूर पोलिसात माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला. या गुन्ह्याचा तपास प्रथम रावेर व नंतर यावल पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्याकडे देण्यात आला. गुन्ह्याच्या तपासासाठी फैजपूर उपविभागाचे डीवायएसपी राजेंद्र रायसिंग आणि एलसीबीचे निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी जळगाव येथील सायबर सेलची मदत घेतली. यानंतर सायबर सेलचे पथक प्रमुख तथा उपनिरीक्षक अंगत नेमाने व त्यांच्या पथकाने फेसबुकच्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियात असलेल्या मार्क झुकरबर्ग यांच्या कार्यालयात संबंधित फेसबुक अकाउंटची यूआरएल पाठवली. तेथून त्या खात्याचा आयपी अॅड्रेस शोधण्यात आला. त्यात या प्रकरणाचे जांभूळधाबा कनेक्शन उजेडात आले. यानंतर पोलिस पथकाने शुक्रवारी रात्री जांभुळधाबा गाठून रत्नदीप ससाणे याच्या मुसक्या आवळल्या. त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...