Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Farmer March With 200 bullock cart At Amalner

पाझर तलावासाठी शेतकऱ्यांचा 200 बैलगाडीसह मोर्चा, ब्रिटीशकालीन चारीद्वारे पुनर्भरण करा

प्रतिनिधी | Update - Jun 04, 2018, 05:01 PM IST

धार पाझर तलावात बोरी नदीतून पावसाळ्यात बोरी नदीतून तालुक्यातील फफो ब्रिटीशकालीन चारीद्वारे पुनर्भरण करा, या मागणीसाठी पर

 • Farmer March With 200 bullock cart At Amalner

  अमळनेर- धार पाझर तलावात बोरी नदीतून पावसाळ्यात बोरी नदीतून तालुक्यातील फफो ब्रिटीशकालीन चारीद्वारे पुनर्भरण करा, या मागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी आज (सोमवार) प्रांताधिकारी कार्यालयावर 200 बैलगाडी मोर्चा काढला.

  तालुक्यातील बोरी नदीवरील फापोरे ते पिंपळे नाला पाटचारी यातून 1970 च्या जवळपास कालावधीत अमळनेर शेतशिवाराला पाणी दिले जात होते. तो पुनर्वापर करून धार पाझर तलाव भरावा यासाठी आंदोलन होते.

  बुजलेल्या पाटचार्‍या खोलीकरण करून पावसाळ्यात वाहून जाणारे पाण्याद्वारे पुनर्भरण करता येईल. अंतर 4 ते 5 किमी येईल व जुनी पाटचारी पोकलँड मशिनद्वारे खोदून जवळपास अंदाजे 33 लाख रुपयांपर्यंत सर्व्हे करून अंदाज पत्रक गिरणा पाटबंधारे खात्याने केले आहे. थ्री आर या योजनेत हे काम समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर आंदोलन होणार याची माहिती असतानाही गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंता संभाजी माने यांनी दिरंगाई केल्याने हा मोर्चा निघाला असा आरोप यावेळी आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रा. गणेश पवार, शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, गणेश धोंडू पाटील यांनी केला आहे.

  कार्यकारी अभियंता संभाजीमाने यांनी चक्क 2 जून रोजी अधीक्षक अभियंत्यांकडे हा प्रस्ताव पाठवला. यामुळे आंदोलनकर्ते चिडले होते. यावर प्रांताधिकारी संजय गायकवाड यांच्या दालनात सचिन पाटील, शिवाजी पाटील गिरणा पाटबंधारे उपअभियंता एस आर शिंपी, कालवा निरीक्षक कमलेश दाभाडे, लिपिक एस. आर.पाटील यांनी याबाबत थेट राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-1 चे अधीक्षक अभियंता व सदस्य सचिव यांना संपर्क साधत याबाबत चर्चा केली असता रविवार पर्यंत माझ्याकडे पत्र आलेले नाही. व त्यांनी माहिती जाणून घेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी व आंदोलन समिती सदस्य यांना नाशिक येथे भेटीस बोलावले आहे. व लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलकांचे समाधान झाले. व 11 ते तब्बल 2 वाजेपर्यंत भर उन्हात शेतकरी बैलगाड्या सोडून आश्वासनाची प्रतीक्षा करत उभे होते.

  गेल्या काही दिवसांपासून दहा वेळा आंदोलने स्थगित करीत येथील शेतकरी वाट पाहत होता. मात्र या गिरणा पाटबंधारे विभागाने कशाचीही तमा न बाळगता दिरंगाई केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बैलगाडी आणून प्रांताधिकारी कार्यालयावर सोडण्यात आल्या.

  शिस्तीत आणल्या बैलगाड्या, बैलगाडीवर खाली पाण्याचा ड्रम, चारा असे साहित्य होते. तसेच या आंदोलनासाठी चक्क प्रांत कार्यालयात दोन बैलगाड्या आणून सोडल्या होत्या. व शेतकर्यांनी चक्क उपोषण सुरु केले होते. याबाबत गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करीत प्रांताधिकारी संजय गायकवाड हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. सदर काम थ्री आर योजनेत समाविष्ट झाल्याने ते थेट राज्य समितीपर्यंत पोहचते. यात दिरंगाई झाली नसती तर मोर्चा निघाला नसता, असा सूर आंदोलन कर्त्यांनी काढला.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शेतकरी आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ..

 • Farmer March With 200 bullock cart At Amalner
 • Farmer March With 200 bullock cart At Amalner

Trending