आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर: निम येथे वीज कोसळून मजूर महिलेचा जागीच मृत्यू, शेतमालकाची मुलगी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत ललिता रविंद भिल - Divya Marathi
मृत ललिता रविंद भिल

अमळनेर- तालुक्यातील निम येथे वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेत शेतमालकाची मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज (बुधवार) दुपारी निम येथील कपिलेश्वर मंदिर शिवारात घडली आहे. ललिता रवींद्र भिल (वय 28) असे मृत महिलेचे नाव असून नेहा गुलाब चौधरी (वय-22) ही जखमी झाली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, शेतात कपाशी निंदणीचे काम करत असताना अचानक जोरदार मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. गुलाब हिरामण चौधरी यांच्या शेतात त्यांचे कुटुंबीय व मजूर काम करत होते. पाऊस सुरु झाल्याने शेतात काम करणारे मजूर चिंचेच्या झाडाखाली आश्रयाला गेले आणि त्याच वेळी मोठा अावाज होऊन चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. त्यात ललिता रविंद्र भिल या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर नेहा गुलाब चौधरी ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. नेहा ही शेतमालकाची मुलगी आहे.

 

नेहाला तातडीने गावातील डॉ. नवल पाटील यांच्याकडे हलवण्यात आले. विजेच्या धक्क्याने नेहाच्या कमरेत जबर दुखापत झाली आहे. डॉ.पाटील यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.नेहावर डॉ प्रकाश ताडे उपचार करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...