आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर- शहरातील पान खिडकी भागातील रहिवासी सोमनाथ जनार्दन मोरे (वय-57) यांचे दि.15 रोजी सायंकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. सोमनाथ मोरे यांना मुलगा नसल्याने यांच्या थोरल्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून मुलगा किंवा मुलगी असा भेद करणार्यांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे.
सोमनाथ जनार्दन मोरे हे अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांना आजाराने जखडले होते. घरात कुणी पुरुष नसला की बापाला मुखाग्नी मुलींनी देणे, ही परंपरा बदलत्या काळाबरोबर रुजू होत आहे. यामुळे जुनी प्रथा बदलत मोरे यांच्या थोरल्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मुलीने मुखाग्नी दिल्यानंतर अपशकून होतो, हा बुरसटलेला विचार मोरे यांची उच्चशिक्षित कन्या श्रद्धा हिने पुसून टाकला आहे. मोरे यांच्या घरची परिस्थिती बिकट असतांनाही श्रद्धा हिने शिक्षण पूर्ण करून वडिलांचे आजारपण केले. संपूर्ण घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेतला. शहरातील सोनार समाजातील हे पहिलेच उदाहरण असल्याचे यावेळी समाजातील लोकांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा..संबंधित घटनेचे फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.