आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये फर्निचर दुकानास भीषण आग; पाच लाखांचे साहित्य जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शहरातील चोपडा रस्त्यावर ख्वाजा मस्जिद जवळील एका फर्निचरच्या दुकानास सोमवारी पहाटे अचानक आग लागली. आगीत सुमारे पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. दुकानाला कुणी अज्ञात व्यक्तिनी आग लावल्याचा संशय दुकानदाराने व्यक्त केला आहे. घटनेबाबत महसूल व पोलिस प्रशासनाकडे प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

 

अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गाला लागून चोपडा रस्त्याच्या कडेला मुन्सी फर्निचर हे शेख असलम शेख अजगर मुन्सी यांच्या मालकीचे दुकान आहे. दुकानात सागवान लाकडापासून विविध प्रकारचे फर्निचर तयार केले जात होते. रविवारी रात्री कामे आटोपून दुकान बंद करून मुन्सी घर गेले तर सोमवारी पहाटे त्यांच्या दुकानास आग लागलीचे निर्दशनास आले.

 

परिसरातील नागरिकांसह पालिकेच्या अग्नी शमन बंबास पाचाराण करण्यात आले मात्र, तोवर सर्व साहित्य व लाकूड जळून खाक झाले होते दुकानात लाकूड कापण्याचे इलेक्ट्रानिक कटर 2, रंधा मशिन 2, खरोपा मशिन 2 ग्रेन्डर मशिन 3 यांची सर्वांची किंमत सुमारे एक लाखाहून अधिक तर दुकानातील इतर साहित्यांसह चार लाखांचे सागवान लाकूड या आगीत जळून खाक झाले आहे. दुकानात इलेक्ट्रीक कनेक्शन असले तरी शॉट सर्किट होणे शक्य नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुकानास आग लावल्याचा संशय मुन्सी यांनी व्यक्त केला आहे. आगीसंर्दभात महसुल व पोलिस प्रशासनास माहिती देण्यात आली आहे तर पंचनामा करण्याकरीता तहसुल विभागातील कर्मचारी दाखल झाले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...