आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार..धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे कडकडीत बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी जनक्षोभ उसळला आहे. नराधमांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी दोंडाईचा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद मध्ये व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. बंद दरम्यान, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयात बालवाडीत शिकणार्‍या बालिकेवर अज्ञात नराधमाने 8 फेब्रुवारीला लैंगिक अत्याचार केला होता. लैगिक अत्याचार घटनेची चव्हाट्यावर आणू  नये, पोलिंसात तक्रार देऊ नका. यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमकविण्यात आले होते. परंतु नातेवाईकांचा प्रयत्नाने जळगावात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. अज्ञात नराधम आणि व संस्था चालक माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख, डॉ रवींद्र देशमुख, महेंद्र पाटील, प्रतीक महाले, नंदू सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एकाच अटक, चार फरार...

आरोपी शिक्षक महेंद्र पाटील यास पोलिसांनी अटक केली असून त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  घटनेची नोंद होऊन बारा दिवस लोटूनही अद्याप नराधमासह अन्य चार आरोपी अद्याप फरारी आहेत.

 

मूक मोर्चा काढून निषेध...

काल, मंगळवारी या अमानुष घटनेच्या निषेधार्थ दोंडाईचा अभूतपूर्व मूक मोर्चा काढून आरोपीना तात्काळ अटक करण्‍याची मागणी करण्यात आली.  अप्पर तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. आरोपीना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी व निंदनीय घटनेचा निषधार्थ दोडाईचा बंद पाळण्यात आला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ  दोंडाईचा येथे पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...