आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DANGEROUS: नवापूरात रंगावली नदीला महापूर; केटीवेअर बंधारा फुटला, सर्तकतेचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- शहरातील रंगावली नदीला पहिल्या पावसात मोठा पूर आला. नदीवर बांधण्यात आलेला केटीवेअर बंधारा फुटला आहे. पुराचे पाणी तालुक्यातील बोकळझर, भामरमळ, वाकीपाडा  गावात  शिरले आहे. बोकळझर गावात तीन घरातील संसार उपयोगी सामान वाहून गेला आहे. पशुधनाची मोठी हानी झाली आहे. नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भामरमाळ गावातील दुकान वाहून गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नवापूर सह गुजरात राज्यातील आहवा (जि.डांग) जोरदार पाऊस झाल्याने रंगावली नदीला यंदा पहिल्यांदा दुथडी भरून वाहत आहे.

 

करंजी ओवरा येथील नदी किनारी असलेले महादेव मंदीर पाण्यात गेले आहे. रंगावलीच्या पुरात मोठ्या प्रमाणात डांग जंगलातून लाकडे वाहून आले आहे.

 

मुसळधार पावसामुळे नवापूर नगर पालिकेचा गलथान कारभार समोर आला आहे. नवापूर शहरातील ग्रामदैवत मरीमाता मंदिरा जवळील शहराला पाणीपुरवठा करणारे केटीवेअर बंधार्‍याच्या संपूर्ण खिडक्या न उघडल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मरीमाता शेजारी धरणाचा भाग फोडून पाणी निघेल आहे. पाण्याचा फोर्स जास्त असल्याने याठिकणी पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने महाकाय खड्डा पडून पाणी वाहून जात आहे. गेल्या वर्षी हीच परिस्थिती निर्माण झाल्याने देखील नवापूर नगर पालिकेने कोणत्याही खबरदारी घेतली नाही. यामुळे ग्राम दैवत मरीमाता मंदिराला धोका निर्माण होऊन मंदिराचा भाग पाण्यात कोसळू शकतो. नवापूरचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र नजन यांनी पुराची पाहणी केली.

 

सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली त्यानंतर रात्री मुसळधार पाऊस झाला गुजरात राज्यात आहवा डांग जिल्ह्यात 4-5 इंच पाऊस झाल्याने नवापूर शहरातील रंगावली नदीला मोठा पूर आला आहे. नागरिकांनी सकाळी पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून फोटो आणि व्हिडिओतून पाहा... रंगावली नदीच्या पुराचे रौद्ररुप...

 

बातम्या आणखी आहेत...