आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल- सातपुड्यातून अवैधरित्या डिंक तस्करी पुन्हा उघडीस आली आहे. वनविभागाच्या गस्ती पथकाने तब्बल दोन लाख रूपये किंमतीचा 550 किलो डिंक व 4 लाख रूपये किंमतीची गाडी असा सुमारे सहा लाखांचा मुददेमाल जप्त केला. सिनेस्टाईल पाठलाग करून पथकाने दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निमड्या ते पाल (ता.रावेर) दरम्यान पाठलाग करीत ही कारवाई झाली.
सातपुड्यातील डिंकाची मध्यप्रदेशात तस्करी...
प्रादेशिक वनविभाग यावल गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील यांनी सातपुड्याच्या डोंगरातून धावडा व सळई वृक्षापासून निघणाऱ्या डिंकची तस्करी विरूद्ध कंबर कसली आहे अवध्या महिन्याभराच्या कलावधीत तीन ठिकाणी कारवाई करीत मोठा डिंकसाठा जप्त केला आहे. गोरख धंद्याची गोपनिय माहिती मिळवण्या करीता त्यांनी अनेक खबऱ्यांचे नेटवर्क सातपुड्या वाढवले आहे. अशाच खबऱ्याकडून जामन्या (ता.यावल) ते पाल या रस्त्याने अवैद्य रित्या संकलीत केलेला तब्बल 550 किलो डिंक गाडीव्दारे मध्यप्रदेशाकडे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गस्ती पथकाचे वनरक्षक एस.एस.माळी, जगदिश ठाकरे, संदिप पंडीत, योगीराज तेली, वनरक्षंक निमड्या ममता पाटील, वनरक्षक पाल वैशाली कुवर या पथकासह या मार्गावर पाळत ठेवली. त्यांना संशयीतरित्या गाडी क्रमांक एमपी. 20 एच.ए. 0443 वेगाने जाताना दिसली. पथकाने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने गाडी न थांबवता पालच्या दिशेने सुसाट नेली. गस्ती पथकाने गाडीचा सिनेस्टाइल पाठलाग करून पालजवळ गाडी रोखली. गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात अवैध डिंक आढळला. वाहनासह डिंक साठी जप्त करून रावेर उपवनज केंद्रात ठेवण्यात आला आहे. संशयीत फिरोज अकबर तडवी व आरीफ सलीम तडवी दोघे राहणार निमड्या (ता. रावेर) यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध डिंक तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
12 पोती डिंक
जंगलातून अनधिकृतरित्या काढत 12 पोत्यांमध्ये सदरील डिंक भरून वाहनाच्या ठेवण्यात आला होता. 550 किलो वजन असलेल्या या डिंकाची किंमत दोन लाख तर वाहनाची किंमत 4 लाख आहे.
डिंकाचा अवैध उद्योग उघड
19 डिसेंबर 2017 रोजी आडगाव व नंतर मानापुरी या दोन ठिकाणाहून साडे तीन क्विंटल डिंक जप्त करण्यात आला होता. 22 डिसेंबर रोजी तिड्या (ता. रावेर) येथून 2 क्विंटल 10 किलो व आता 550 किलो डिंक मिळून आला आहे. त्यातून सातपुड्यात डिंकाचा अवैधरित्या मोठा व्यवहार होत असल्याचे आता उघड झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... वन विभागाने केलेल्या कारवाईचे फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.