आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकी पेशाला काळीमा..विद्यार्थिनींसोबत अश्लिल चाळे, अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- कळमसरे येथे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील शिक्षक जगदीश पाटील याने अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलींचे पोलिस स्थानकात इन कॅमेरा जबाब घेण्यात आले. 


जगदीश भास्कर पाटील (रा. मारवड, ह.मु. अमळनेर) हा कळमसरे जि.प.शाळेत शिक्षक अाहे. हा शिक्षक विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे व अत्याचार करत त्यांना दमदाटी करत हाेता. माझे कोणीही काहीही करू शकत नाही. मी कोणालाही घाबरत नाही, असे म्हणून तो धमकावत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. याबाबत काही मुलींनी घरी पालकांना सांगितल्याने हा प्रकार समोर आला. डीवायएसपी रफिक शेख यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती जाणून घेतली.

 

मुलींसोबत अश्लीलचाळे नंतर दमदाटी

शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लीलचाळे करीत नराधम शिक्षक मुलींना दमदाटी करत होता. 'माझे कुणीही काही करू शकत नाही. मी कुणाला घाबरत नाही.', असे धमकावत होता. पीडित विद्यार्थिनींनी झालेला प्रकार घरी पालकांना सांगितला. पालकांनी पोलिसांत धाव घेतली. परंतु शिक्षक रजा घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. डीवायएसपी रफीक शेख हे घटनास्थळी जाऊन माहीती जाणून घेत अमळनेर पोलिस स्थानकात विद्यार्थिनींचा इन कॅमेरा जबाब घेतला. आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अमळनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...