आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रा: 29 जुलैपासून भाविक रवाना होणार, 12 हजार भाविकांना ग्रीन कॅटेगिरीत स्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- हज यात्रा 2018 साठी महाराष्ट्रातील मुस्लिम भाविक 29 जुलैपासून यात्रेला सुरुवात करणार आहेत. राज्यातील मुंबई, नागपूर, औरंगाबाद या तीन विमानतळांवरून यात्रेला सुरुवात करता येईल. यंदा देशभरातील तब्बल 12 हजार भाविकांना ग्रीन कॅटेगिरी मिळाली असून त्यांना मक्का येथील हरम शरीफजवळ राहण्याची संधी मिळणार आहे.

 

 

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील भाविकांची यात्रा 14 जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हज कमिटीतर्फे यंदाच्या वर्षी 30  हजार भारतीय भाविकांना ग्रीन कॅटेगिरीत स्थान मिळाले होते. मात्र, मक्का येथील हरम शरीफजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने केवळ 12 हजार भाविकांना ग्रीन कॅटेगिरीची अर्थात हरम शरीफच्या जवळ राहण्याची संधी मिळणार आहे, तर उर्वरित 18 हजार भाविकांना अजिजिया कॅटेगिरीत स्थान मिळाले असल्याने त्यांना हरम शरीफपासून काही किलोमीटर दूर अंतरावर राहावे लागेल. यासाठी भाविकांना ग्रीन कॅटेगिरीतून अजिजिया कॅटेगिरीत रूपांतर करण्यासाठी हज कमिटीकडे अर्ज करावा लागणार आहे. देशभरातून यंदा सुमारे सव्वा लाख भाविक हज यात्रेसाठी जाणार आहेत, अशी माहिती हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकसूद अहमद खान यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...