आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते रयतेचे राजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कुटुंबाची आस्थेने विचारपूस करतानाचे चित्र प्रख्यात चित्रकार मिलिंद विचारे यांनी रेखाटले अाहे. - Divya Marathi
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कुटुंबाची आस्थेने विचारपूस करतानाचे चित्र प्रख्यात चित्रकार मिलिंद विचारे यांनी रेखाटले अाहे.

दुष्काळात केली हाेती कर्जमाफी
सुरतेची माेहीम हा माेगल साम्राज्याला लागाेपाठ दुसरा माेठा धक्का हाेता. परतीच्या प्रवासात साल्हेर, मुल्हेर, बागलाण, नाशिक, चाकण व पुणे परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शिवरायांनी त्यांना दिलासा दिला. धान्य, बी-बियाणे व पैसा देऊन त्यांना जमिनी कसण्यास प्राेत्साहन दिले. रयतेच्या जमिनींची माेजणी करण्याचे हुकूम काढले. जमिनीची प्रतवारी केली. कर अाकारणीमध्ये सुसूत्रता अाणली. पिकांची परिस्थिती पाहून कर अाकारणी करण्याच्या सूचना दिल्या. पडीक जमिनी लागवडीखाली अाणल्या. ज्यांच्याजवळ जमिनी नव्हत्या व जमीन बाळगण्याचा अधिकार धर्माने नाकारला हाेता, अशा अस्पृश्य, अादिवासी, काेळी, भंडारी, रामाेशी, बंजारा, धनगर इत्यादी जातींच्या लाेकांना जमिनी देऊन क्षत्रिय बनवले व जातीव्यवस्थेला हादरा दिला. दुष्काळात रयतेचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांचा सुतळीचा ताेडादेखील फुकट घ्याल, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावल तर तुम्हाला कडक शिक्षा देण्यात येईल, अशा सक्त सूचना सैनिकांना दिल्या. त्यामुळे शेतकरी अानंदित झाले.

 

आज कर्जमाफीसाठी करावा लागताे संघर्ष
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ, गारपीट, अवकाळीसारख्या नैसर्गिक अापत्तीच्या संकटात अडकला अाहे. शेतमालास भाव मिळत नाही. त्यामुळे रयतेचा पाेषणकर्ता बळीराजा कर्जबाजारी झाला अाहे. जनक्षाेभानंतर सरकारने मागील वर्षी जून महिन्यात कर्जमाफी दिली. परंतु ती प्रत्यक्षात खात्यात पडण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेचे चक्रव्यूह ताेडावे लागत अाहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी हिताच्या याेजनांची अंमलबजावणी याेग्य पद्धतीने व्हावी, हीच अपेक्षा.

 

पुढील स्‍लाइडवर चित्रांच्‍या माध्‍यामांतून पाहा, शिवइतिहास...

बातम्या आणखी आहेत...