आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरच्‍या महिलांना घरात आणुन पत्‍नीसमोर करत होता असे, पत्‍नीने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - देवेंद्रनगरातील प्ले स्कूलच्या संचालिका अंजली थोरात यांचे पती बाहेरच्या महिलांना घरात आणून तिच्याशी दिसण्याची तुलना करायचे. त्यामुळे अंजलीने आत्महत्या केल्याचे तिच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. तिच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पती दिनेश थाेरात हा फरार झालेला आहे. या प्रकरणात रामानंदनगर पोलिस दोघांच्याही मोबाइलचे सीडीआर तपासणार असल्याचे तपास अधिकारी प्राची राजूरकर यांनी सांगितले.


थोरात पती-पत्नी मध्ये तणाव निर्माण झालेला होता. हा तणाव टोकाला गेला होता. त्यानंतर नातेवाईकांनी बैठक बसवून सामंजस्याने हा वाद मिटवला होता. त्यानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला हाेता.


दरम्यान, प्रथमदर्शनी कर्जामुळे अंजली यांनी आत्महत्या केल्याचे चित्र रंगवले जात असले तरी, त्यात तथ्य नाही. मृत अंजलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेशचे अफेअर असल्याचे समोर आलेले आहे. पाेलिस प्रशासन त्या दृष्टीने तपास करीत अाहे.


पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहेत पतीवर आरोप...  

 

बातम्या आणखी आहेत...