आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा तोल गेल्याने पडली विहिरीत; पतीने जीव धोक्यात टाकून वाचवले तिचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- पत्नीचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली तेव्हा प्रसंगावधान राखून पतीने जीव धोक्यात टाकून विहिरीत उतरून तिचे प्राण वाचवले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज (शनिवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास साकळी येथे घडली.

 

सूत्रांनूसार, साकळी येथील रहिवासी जरीना लतीफ तडवी (वय-35) ही देविदास उदयसिंग पाटील (रा.नावरे) यांच्या साकळी गावालगतच्या शेतात विहिरीजवळ काम करीत होती. दरम्यान तिचा तोल जाऊन ती सुमारे 150 फुट खोल विहिरीत कोसळली. ती पाण्यात बुडत असताना तिचा पती लतीफ कासम तडवी याने प्रसंगावधान राखून क्षणाचा विलंब न करता तत्काळ विहीरीत उडी  घेतली. तिला बाहेर काढले. दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉं.रश्मी पाटील, डॉ. स्वाती कवडीवाले यांनी दोेघांवर प्राथमिक उपचार केले. जरीना तडवी हिची प्रकृती गंभीर असल्यानेे तिला तात्काळ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...