आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • नवापुरात शाळेच्या इमारतीवर वीज पडली, शाळेत हजर होते 500 विद्यार्थी, मोठा अनर्थ टळला Lightning On School Building In Navapur Nadurbar

नवापुरात शाळेच्या इमारतीवर वीज पडली, शाळेत हजर होते 500 विद्यार्थी, मोठा अनर्थ टळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- शहरासह तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात शुक्रवारी दहा वाजेच्या सुमारात

विजेचा कडकडाटासह नवापूर तालुक्यात अाज (शनिवार) अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र सकाळी साडेदहाच्या सुमारास नवापूर शहरातील डी.जी. अग्रवाल इंग्लिश मेडियम स्कूलच्या इमारतीवर वीज पडून मोठा आवाज झाला.

 

दरम्यान, शाळेत एकूण 500 विद्यार्थी उपस्थित होते. मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून वीज पडल्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

विद्यार्थी सैरावैरा पळत सुटले...

डी.जी.अग्रवाल इंग्लिश मेडियम स्कूलची इमारत तीन मजली आहे. चौथ्या मजल्यावर सिमेंटची पाण्याची टाकी आहे. साडे दहा वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि थोड्या वेळाने वीज शाळेतील पाण्याचा टाकीवर पडली. टाकीचा काही भाग कोसळला. विटा, प्लास्टरचे  तुकडे तिसर्‍या मजल्यावर कोसळून मोठा आवाज झाला. विद्यार्थी व शिक्षक  भयभीत झाले. सर्व विद्यार्थी मैदानात सैरावैरा पळत सुटले. इयत्ता पहिली ते दहावीचे सुमारे 500 विद्यार्थी घाबरून गेले लहान मुले रडायला लागेल लगेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढली व थोड्या वेळाने शाळेला सुटी जाहीर केली.

 

तळमजल्यावर इयत्ता पहिली ते चौथी व नववी दहावी चे चार वर्ग व कार्यालय आहे. दुस-या मजल्यावर पाचवी ते आठवी आणि इतर वर्ग आहेत. तिस-या मजला एक छोटा रूम त्यावर चौथ्या मजल्यावर पाण्याची टाकी बांधली आहे. येथे वीज पडली होती.

 

वीज रोधकयंत्र बसण्याची मागणी

 डी जी अग्रवाल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये 500 विद्यार्थी शिकत आहे. या शाळेतील संचालक मंडळाने शालेय इमारत अद्ययावत सुविधायुक्त तयार केली आहे. परंतु वीज पडल्याने वीज रोधक यंत्र बसण्याची मागणी पालकांनी केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक पाहा... संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...