आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाह करून गावात परतले प्रेमीयुगुल..प्रियकराची निर्घृण हत्या, बुलडाण्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- प्रेमविवाह करुन गावात परतलेल्या प्रेमीयुगुलावर जीवघेणा हल्ला करत प्रियकराची निर्घृण हत्या करण्‍यात आल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंढेरा येथे घडली आहे. विलास खंडू भोसले (रा.अंढेरा, ता. चिखली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

सूत्रांनुसार, विलास भोसले आणि कल्पना भोसले या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी काही दिवसांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर प्रेमीयुगुल काल (गुरुवार) पावणे दहा वाजेच्या सुमारास गावात परतले असता आरोपी कैलास येणू भोसले (वय-22), सावन येणू भोसले (वय-26), निलम बबन भोसले (वय-24), येणू फुलाराम भोसले (वय-48, सर्व रा. पारधी वस्ती, अंढेरा) या चौघांनी प्रेमीयुगुलाला गावातील पाण्याचे फिल्टर प्रोजेक्टजवळ घेरले. विलास भोसले यास धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. कल्पना हीलाही मारहाण केली. या प्रकरणी विलासचा भाऊ परिहार खंडू भोसले (वय-33) याने दिलेल्या तक्रारीवरून चौघे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले असता सर्वांना कोर्टाने 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...