Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Marath Reservation Agitation In Yawal

CM राजीनामा द्या.. देवेंद्र फडणवीसविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; यावलमधून मागणी

प्रतिनिधी | Update - Jul 24, 2018, 05:24 PM IST

सकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद येथील गोदावरी पात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणास मंगळवारी‍ श्रद्धां

 • Marath Reservation Agitation In Yawal

  यावल- सकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद येथील गोदावरी पात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणास मंगळवारी‍ श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मुख्यमंत्र्यांच्या मराठा समाजाविरुद्ध असलेल्या दुटप्पी व आकसाची वृत्तीचा निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व त्यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. दुपारी दोन वाजेला काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येत मराठा समाजबांधव सहभागी झाले होते व घोषणाबाजीने संपूर्ण शहर दणणाले होते.

  मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यात विविध आंदोलन सुरू आहेत या आंदोलनाचा एक भाग असलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चा सहभागी असलेल्या कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरून काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने 23 जुलै रोजी दुपारी तीन वाजता गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेतली. मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी प्रशासनास जलसमाधी आंदोलनाचे निवेदन दिले होते व जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रशासनानेच मराठा युवकाचा खून केला, असा आरोपी मत संपूर्ण मराठा समाजाचे आहे.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या आंदोलनाची संपूर्ण कल्पना आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून समाजाच्या भावना भडकावल्या आहेत. गेल्या वर्षात मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यात 58 मोर्चे काढले त्यात कुठेही गालबोट लागले नाही मात्र या शांततेच्या मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीच दखल घेतली नाही म्हणूनच समाज विविध आंदोलन करणे भाग पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री समाजाच्या मागण्या द्वेषभावना तून व जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली असून या काकासाहेब शिंदे या युवकाचा मृत्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, तेव्हा यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाकडे मागणीचे निवेदन देण्यात आले त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत करावी व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी व अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

  यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील किनगावकर, यावलचे उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नगरसेवक अतुल पाटील, देवकांत पाटील, संतोष पाटील, बापू जासूद, संजय भोईटे,नरेंद्र पाटील, दिलीप राजोरे, अरूण पाटील, संदिप वायकोळे, उज्वल पाटील, गणेश महाजन, प्रकाश पवार, गणेश येवले,अतुल भोसले, मयुर पाटील,प्रा. संजय कदम, दिपक पाटील, दत्तात्रय पाटील, सुनिल गावडे, वसंतराव भोसले सह मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी होती पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी व प्रभारी नायब तहसिलदार आर. बी. माळी यांना निवेदन देण्यात आले.


  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... यावल येथील मराठा आंदोलनाचे फोटो..

 • Marath Reservation Agitation In Yawal
 • Marath Reservation Agitation In Yawal
 • Marath Reservation Agitation In Yawal

Trending