आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मनीषा गणेश सोनवणे (रा.करंज, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) हिने विवाहित असताना व तिने पतीशी फारकत न घेता यावल येथील संतोष ठाकूर यांचेशी लग्न केले. यात आठ जणांनी मध्यस्थी केली होती. एक ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या लग्नाच्या हमी करीत ठाकूर याचेकडून 1 लाख रूपये घेण्यात आले होते व 14 ऑगस्ट रोजी पळून जाण्याच्या बेतात पाच जणांना 14 ऑगस्टला पोलिसांनी वधु मनीषा सोनवणे हिच्यासह अलका ईश्वर गायकवाड (रा.खंडपूरी, ता.जि. जालना), धृपदाबाई अश्रृबा शिंदे, सुनील अश्रृबा शिंदे, सुनिता सुनिल शिंदे (सर्व रा. पुंडलिक नगर, चिखली, जि.बुलढाणा) या 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीत या पाच जणांनी गुन्ह्यात अजून बाबासाहेब लिंबाजी रंधवे, सुजाता नामदेवराव मुख्यदल (दोघे रा.देऊळगाव राजा, जि. बुलढाणा), अनिल नाथा झिणे व अनुसयाबाई शंकर यादव (दोघे रा.जालना) या चौघांचा समावेश असल्याचे सांगितले. तेव्हा यावल पोलिसांच्या पथकाने 17 ऑगस्टला त्यांना अटक केली. चौघांना 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
सुरवातीच्या पाच आरोपींची मंगळवारी पोलिस कोठडी संपल्याने त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायधिश डी. जी. जगताप यांच्या कोर्टात हजर केले असता या आरोपींकडून अनेकांची फसवणूक झाली असावी, म्हणून त्यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळावी, असे कोर्टासमोर सरकारी वकील नितिन खरे यांनी सांगितले. कोर्टाने मागणी मान्य करत आरोपींना पुन्हा सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रा. का. पाटील, हवालदार गोरख पाटील, हवालदार संजीव चौधरी करीत आहे.
मै हू दुल्हन कुछ वक्त की...
या टोळीने मनीषा सोनवणे हीचा विवाह 11 जून रोजी मध्येप्रदेशातील खंडवा जवळील आशापूरी येथील सुरेश गणपत यादव या तरूणाशी लावून दिला होता. त्याच्याकडून 85 हजार रुपये उकळले होते. मनीषाने दोन आठवडे संसार करून तेथून पोबारा केला होता. 'मै हु दुल्हन कुछ वक्त', की अशी भूमिका मनीषाने अजून किती जणांबरोबर बजावली आहे, याचा शोध पोलिस घेत आहे.
61 हजारांची रोख रक्कम हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून 61 हजाराची रोख रक्कम हस्तगत केली आहे. लग्न लावून देणार्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. मध्यप्रदेश व गुजरात राज्यातही या टोळीने कोणाकडून पैसे उकळले आहेत का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.