आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल- शहरातील 33 वर्षीय तरूणाने चक्क एका विवाहितेचे लग्न केले. लग्नानंतर चांगल्या वागवणुकीच्या हमीकरीता तरुणाकडून एक लाख रूपयेदेखील उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच आरोपींनी विवाहितेसह पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी सापळा रचून पाच संशयीतांच्या मुसक्या आवळत 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने यावलसह राज्यात अनेकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या हरीओम नगरातील संतोष मनुसिंग ठाकूर (वय-33) या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार 1 ऑगष्टला श्रीक्षेत्र मनुदेवी येथे मंदिरावर मनिषा गणेश सोनवणे (रा.करंज, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) हिच्याशी विवाह झाला होता. ही सोयरिक जोडणाऱ्या मुलीचे नातेवाइक अलका ईश्वर गायकवाड (रा.खंडपूरी ता.जि.जालना), धृपदाबाई अश्रृबा शिंदे, सुनील अश्रृबा शिंदे, सुनीता सुनील शिंदे (सर्व रा.पुंडलिक नगर, चिखली, जि. बुलढाणा) व बाबासाहेब, अनिल, सुजाता (पूर्ण नाव माहीत नाही) अशा विवाहितेसह 9 जणांनी संतोष ठाकूर याचेकडून लग्नानंतर विवाहितेशी चांगला संसार करण्यासाठी हमी म्हणून एक लाख रूपये रोख उकळले होते. नंतर मनिषा आणि संतोष या दोघांचे लग्न लावून दिले. मनिषा ही यावलला नांदत होती. दरम्यान 14 ऑगस्टला तिने घरातून पळ काढला. तेव्हा क्षणाचा विलंब न करता संतोष ठाकूर यांने पोलिसांना संपूर्ण माहिती दिली.
पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रा.का.पाटील, हवालदार गोरख पाटील, संजीव चौधरी यांनी शिताफीने या टोळीतील विवाहितेसह पाच जणांना यावल बस स्थानकावर ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून गुरूवारी येथील प्रथमवर्ग न्यायधिश डी. जी. जगताप यांच्या कोर्टात हजर केले आहे.
असे फुटले बिंग..
लग्नानंतर मनिषा ही तासंतास मोबाइलवर बोलत होती. संतोषला तिच्यावर संशय आला. त्याने मोबइलमध्ये कॉल रेकॉर्डिंग केले तेव्हा ती आधीच विवाहित असल्याचे समोर आले. तिला पतीपासून दोन मुले असून तिने पतीसोबत फारकतही घेतली नसल्याची माहिती संतोषला समजली. त्याने पोलिसांना सुचित करून या टोळीचा पर्दाफाश केला.
अनेकांची फसवल्याची शक्यता...
अशा प्रकारे पैसे उकळून तरूणांना तालुक्यासह राज्यभरात अनेकांना गंडा घातला आहे. या टोळीने संतोषसह अजून काही जणांना अशा प्रकारे फसवणूक केल्याची देखील शक्यता असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.