आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल: सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग; पोलिसांत गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- सानेगुरूजी विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेत जाताना विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. विद्यालयाच्या प्रवेशव्दारात झालेल्या बदलामुळे टारगट मुलांना विद्यार्थिनींची छेडखानीत चांगलेच फावले आहे. आधीचे प्रवेशव्दार बंद केल्याने पालकांमधून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संशयीत आरोपीला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.


शहरात नगरपालिका संचलित सानेगुरूजी विद्यालय आहे. गेल्या काही दिवसांपासुन येथील विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार समोर आले होते. पोलिसांनी देखील शाळेत जाऊन शिक्षक व विद्यार्थ्यी/विद्यार्थिनींची संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत विद्यालयाचे पूर्वीपासुन असलेले समोरील प्रवेशव्दार बंद केल्याने शाळेच्या मागील बाजूस निर्वस्ती भागातून प्रवेशव्दार सुरू केल्याने मुलींच्या छेडकाढण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे समोर आले होते. त्याच रस्त्यावरून गुरूवारी 12 वाजेच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला भरत गोपाळ कोळी (रा. व्यासनगर) याने तिची छेड काढली. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थिनी शाळेत न जाता घराकडे परतली. कुटुंबियांना माहिती देत पोलिस थेट ठाणे गाठले. संशयित आरोपीविरूद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायदा 2012 च्या कलमानुसार विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...