आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी NCP नेते अनिल पाटील वाढदिवशी करणार लाक्षणिक उपोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल पाटील यांचा उद्या (ता.7 जुलै) वाढदिवस आहे. वाढदिवशी ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. अमळनेर विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी अमळनेर तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास ते बसणार आहेत.

 

या आहेत मागण्या...
- अमळनेर तालुक्यासह 5 तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी संजीवन असलेले पाडळसरे धरणाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे व पोकळ आश्वासन देणे बंद करावीत.
- शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा झालाच पाहिजे, बोंडअळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई तात्काळ मिळावी.
- पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी.
- अमळनेर विधानसभा क्षेत्रातील पीक विम्यापासून वंचित अमळनेर तालुक्यातील 20 गावे तसेच पारोळा तालुक्यातील 42 गावे असे ऐकूण 62 गावांचा देखील समावेश करण्यात येऊन त्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी.
- संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, कापसाला सहा हजार रूपये हमी भावाचे पोकळ आश्वासन हवेतच विरली. तो भाव शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा, शेती पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, प्रलंबित बोहरा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी निधीची घोषणा झालेली असून सुद्धा अमलबजावणी झालेली नाही तर लवकर सुरू करण्यात यावी.
- भिलाली बंधारा ,खळेश्वर बंधारा, सबगव्हाण पाझर तलाव,तसेच लोटाबाडगी अभावी रखडलेली कामे निधी उपलब्ध करून तात्काळ सुरू करण्यात यावे.  - तामसवाडी धरणातून बॊरी नदीला आवर्तन सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यात यावा, नदी जोड प्रकल्पाचे पोकळ आश्वासने बंद करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
- अमलनेर तालुका व संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था वाढत्या चोरीचे प्रमाण सुरू असलेली अवैध धंदे यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा. - पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर यांची न परवडणारी दर वाढ कमी करण्यात यावी. शालेय विध्यार्थीच्या प्रवेश प्रकियेसाठी लागणारे जात पडताळणी, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळण्यात मोठया अडचणी येत आहेत त्या त्वरीत सोडवाव्यात, रमाई आवास योजना ,शबरी आवास योजना, घरकुल आवास योजना, यांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी. अशा मागण्या घेऊन ते एकटे उपोषण करणार आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... वाढदिवशी लाक्षणिक उपोषण करणारे NCP नेते अनिल पाटील यांचा व्हिडिओ आणि फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...