आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनुर धरणाच्या उजव्या कालाव्यात पोहण्यास गेलेल्या चार मुलांपैकी एकाचा बुडून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- कोसगाव–पाडळसे दरम्यानच्या रस्त्यावरील पाटचारीत पोहण्यास गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी एक पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेजस सुनील पाटील (वय-16, रा.बामणोद) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (दि.9) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. घटनास्थळी मुलाचा शोध घेण्‍याचे काम सुरु आहे.


हतनुर धरणाचा उजवा कालावा हा चोपड्याकडे जातो व सध्या धरण भरल्याने कालव्याव्दारे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालव्या मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यात यावल तालुक्यातील कोसगाव–पाडळसे दरम्यान रस्त्यावर हा कालवा आहे. व त्या रस्त्यावर पुल असून येथे गुरूवारी बामणोद येथील चार अल्पवयीन मुले पोहण्यासाठी आले होते. साडे दहाच्या सुमारास पाण्यात तेजसने उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. सोबतच्या मुलांनी त्याचा वाचवण्याचा प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले.

 

दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर तेजसचा मृतदेह काढण्यात आला आहे. घटनेची माहिती पाडळसे गावात पोहचतास पोलिस पाटील सुरेश खैरणार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर तायडे, बामणोदचे गुणवंत निळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. फैजपूर पोलिसांना घटनेची माहिती देताच सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम, हवालदार इकबाल सैय्यद घटनास्थळी दाखल झाले तर पट्टीचे पोहणारे रवींद्र अडकमोल, प्रशांत सोनवणे, पांडूरंग कोळी, दीपक माचले, गोपाळ कोळी घटनास्थळी पोहोचले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...