आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident: दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, गंभीर जखमीला औरंगाबादला हलवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- किनगाव-इचखेडा गावा दरम्यान सोमवारी दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती त्यात तीन जण जखमी झाले होते तर जमीन वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला. शुभम धनराज शिंदे पाटील (वय-19, रा.लोहारा. ता.पाचोरा) असे आहे. इतर दोघांची प्रकृती देखील गंभीर असून त्यातील एकाला औरंगाबाद येथे हलवण्यात आलेले आहे


किनगाव ते इचखेडा रस्त्यावर सोमवारी 11 वाजेच्या सुमारास किनगाव येथील शुभम पाटील (वय-20)  हा दुचाकीने (एमएच. 19 ए. एल. 3283)  इचखेड्याकडे जात होता. इम्रान अरमान तडवी (वय-30) व मुकद्दर कलींदर तडवी (दोघे रा.इचखेडा) दुचाकीने (एमएच. 19 ए झेड 6786) किनगावकडे येत होते. दोघांची समोरासमोर जबर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता. दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तिन्ही जखमींना जिल्हा समान्य रूग्णालयात उपचार्थ हलवण्यात आले होते. परंतु इमरान अरमान तडवी याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला रात्री उशिरा औरंगाबाद येथे उपचार तर रवाना करण्यात आले आहे. शुभम धनराज शिंदे पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

बातम्या आणखी आहेत...