आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! यावलमध्ये मध्यान्ह भोजनाकरिता आलेले धान्य किडलेले, आढळल्या अळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- साने गुरूजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनाकरिता आलेल्या धान्यात अळ्या व कीटक आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन, गटनेता राकेश कोलते यांनी बुधवारी शाळेत जावून पाहणी केली असता हा प्रकार उघडीस आला.

 

याबाबत त्यांनी तक्रार केल्यावर तात्काळ शालेय पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी शाळेला भेट दुवून शाळा साठवण केलेल्या गोदामाचा पंचनामा केला. मुख्यध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

विद्यार्थी संख्येपेक्षाजास्त आढळला धान्य साठा
नगर पालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणार्थ येतात. विद्यार्थ्यांकरीता शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. शासनाच्या शिक्षण विभागाकडून धान्य पुरवठा केला जातो. नुकतेच शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन व्यवस्थित दिले जात आहे की नाही याची पाहणी करण्याकरीता पालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव–महाजन व गटनेता राकेश कोलते यांनी बुधवारी शाळेची पाहाणी केली. धान्य साठवण केलेल्या गोदामाची पाहणी केली असता तेव्हा मोठ्या प्रमाणात धान्य साठवण केलेले आढळून आले. धान्यात मोठ्या प्रमाणात अळ्या आणि कीटक आढळून आले.

 

काय म्हणाले मुख्याध्यापक...
मुख्याध्यापक टी.सी. बोरोले यांनी सांगितले की, धान्याचा हा जुना साठा आहे. याबाबत शिक्षण विभागास सूचीत करण्‍यात आले आहे. परंतु शाळेत क्षमतेपेक्षा जास्त साठा आढळून आल्याने नित्कृष्ट धान्य व क्षमतेपेक्षा जास्त असल्याची तक्रार शिक्षण विभागास करण्यात आली आहे.  पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी शाळेवर दाखल होत गोदामाचा पंचनामा केला. याबाबत मुख्यध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
 

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ...

काही वर्षांपूर्वी राज्यातील काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याने खळबळ उडाली होती तेव्हा आपण देखील पालिकेच्या या शाळेत पाहणी केली असता येथे क्षमतेपेक्षा जास्त धान्य साठा व तो देखील आळ्या आणि कीड लागलेला.  असे निकृष्ट अन्न शिजवून विद्यार्थ्यांना दिले जाते हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया रूख्माबाई भालेराव यांनी व्यक्त केली. अतिरिक्त साठ्याची चौकशी करण्‍यात येणार आहे. तोपर्यंत शाळेचे गोदाम सिल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...