आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SMUGGLING: गुजरातमध्ये मध्यप्रदेश-महाराष्टाच्या सीमावर्ती भागातून होते दारूची तस्करी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार-  गुजरात राज्यात दारूबंदी आहे. त्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्टाच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मुंबई येथील भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीआधारे पथकाने नवापूर तालुक्यातील सुकवेल शिवारातील एका शेतात छापा टाकला. या धडक कारवाईत हरियाणा राज्यातनिमित्त आणि विक्रीची परवानगी असलेला दोन कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि चार ट्रक जप्त करण्‍यात आला.

 

यात काही बनावट मद्य असून गुजरात राज्यात तस्करीच्या हेतून इतका मोठा मद्यसाठा करण्यात आला होता. मात्र,याबाबत स्थानिक पोलिस आणि उत्पन्न शुल्क विभागाला काहीच माहीत नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजपर्यत जिल्ह्यात ज्या मोठ्या कारवाई झाल्यात त्या बाहेरील पथकानेच केल्या आहेत.

 

मद्यसाठ्यावरील कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आल्याने संशय ही व्यक्त केला जात आहे. माध्यमांनाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

 

त्यात रॉक अॅण्ड स्ट्रॉम व्हिस्कीच्या 12 हजार 576 बाटल्या, गोवा प्रिमियम व्हिस्कीच्या  26 हजार 116 बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 61 हजार 200 बाटल्या, ऑल सिझन व्हिस्कीच्या तीन हजार 624 बाटल्या, एपिसोड व्हिस्कीच्या 768 बाटल्या, रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 288 बाटल्या, रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 192 बाटल्या आदी वेगवेगळ्या विदेशी दारूचे 2,475 बॉक्स जप्त करण्यात आले. त्यांची किंमत दोन कोटी दोन लाख 50 हजार 720 रुपये इतकी आहे. हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत संशयीत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, दक्षता व अंमलबजावणी पथकाचे संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे, निरिक्षक प्रसाद सास्तूरकर, दिपक परब, दिलीप काळेल, प्रमोद कांबळे नंदुरबार अधीक्षक मोहन वर्दे व पथकाने केली. त्यांना नाशिक विभाग, पुणे विभाग भरारी पथक व नंदुरबारच्या पथकाने मदत केली. नवापूर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला.  

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. पोलिसांच्या धडक कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...