आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस गाडीने धडक देताच दुचाकीचे झाले दोन तुकडे; भाजपच्या पदाधिकार्‍यासह दोघे गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- तालुक्यातील नवी सावरट जवळील सुरत-नागपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोलिस गाडी व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांचावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमध्ये भाजपचे नवापूर तालुका सरचिटणीस समीर दलाल (वय-45) व त्यांचे मित्र इम्रान यांचा समावेश आहे. समीर दलाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

 

समीर दलाल आणि इम्राण हे दोघे नवापूरहून नंदुरबारकडे जात होते. त्याचवेळी नंदुरबारहून पोलिस मेकॅनिकल पथकाचे पोलिस वाहन नवापूरकडे येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. पोलिस वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिका फोन करून डाॅ. सोनवणे, पायटल लाजरेश गावित यांनी तात्काळ उपचारासाठी नवापूर रूग्णालयात नेले.

 

जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला हेल्मेट वापरण्याचा सल्ला

जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी शिरीष नाईक व जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित यांनी नंदुरबार जात असताना घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. वैद्यकीय अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीने उपचार करण्याचे सांगितले महामार्गावरील तरूणांना व मोटरसायकल स्वार यांना हेल्मेट परिधान करण्याच्या सल्ला दिला.

 

काही काळ वाहतूक ठप्प
नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी घटनेची पाहणी केली त्यानंतर पंचनामा करण्यात आला. काही महामार्ग क्रमांक सहा वाहतूक ठप्प झाली. नवापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...