आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक परिस्थिती बेताची तरी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकले शालेय विद्यार्थी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर- एकीकडे शिक्षणाचा अभाव व पालकांची कमकुवत आर्थिक परिस्थिती असूनही पिंपळनेर शहरासह साक्री तालुक्यातील अनेक शालेय विद्यार्थी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.हे ज्वलंत उदाहरण चौका-चौकात पाहण्यास मिळते.

 

शिक्षण घेऊन आपले भविष्य घडविण्याच्या वयात 9 ते 16 वयोगटातील मुलांचे फेसबुक अकाऊंट मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येते. यामुळे शहरासह अगदी खेड्यातही याचा सर्रासपणे वापर केला जात आहे. इंटरनेटच्या क्रेझमुळे व महागड्या मोबाईल्समुळे पालकांना आर्थिक फटकाही बसत आहे.

 

पूर्वी शालेय विद्यार्थी शाळेतून घरी येऊन, दप्तर टाकलं की हातपाय धुऊन, खाऊ खाऊन कधी अंगणात खेळायला जातो असे व्हायचे. पण त्या अंगणाची व मैदानाची जागा आता मोबाइल स्क्रीनने घेतली आहे. ह्याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर व शरीरावर अप्रत्यक्षपणे होत आहे. मैदानी खेळ सुटल्याने मुलं शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे. कोडी, बुद्धिबळ, चौपट,सापशिडी, विटी-दांडू,भोवरा,क्रिकेट यांसारख्या मनोरंजक व बौद्धिक खेळांची जागा मोबाइलच्या डोक्याने (मेमरीने) चालणाऱ्या गेमने घेतली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या बुद्धीच्या विकासावर व कल्पकतेवर होऊन मुलांची चंचल वृत्ती पोकळ होत चालली आहे. गोष्टीची पुस्तके कालबाह्य ठरून मोबाइलवर कथा, वाचल्या पाहिल्या जातात त्यामुळे पुस्तकांचे ते सुगंधीस्पर्शी अनुभव मुकत चालले आहेत उलट मोबाइल स्क्रीनमुळे डोळ्यांवर व रेंजमुळे शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. पालक आपल्या मुलांना घरी एकटे असतात, व अडीअडचणीला इमर्जन्सी म्हणून मोबाईल घेऊन ठेवतात. ते गरजेचेही आहे.पण त्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर ह्याचा सदूपयोग न होता मुले गेम्स, चॅटिंग, क्लिपिंग पाहणे या सारख्या गोष्टींमध्ये स्वतःला पूर्ण झोकून देतात. या मुलांकडून अनेकदा लहान-मोठे गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुलांमध्ये असलेल्या अज्ञानामुळे सोशल मीडियावर अक्षेपहार्य माहिती सार्वजनिक केल्यास पोलिसांत गुन्हाही दाखल केला जातो.

 

नेट सर्चिंगमध्ये जशी कोणतीही चांगली माहिती क्षणात उपलब्ध असते तशी वाईट गोष्टींचीही भर असते. वयात आलेली मुले जर वाईट गोष्टींच्या आहारी गेली तर त्याचे विपरीत परिणाम आपणास दिसू लागतात. हल्ली घरात पालकच  स्मार्टफोन वरील फेसबुक व व्हॉट्सअॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला मोलाचा वेळ ह्या अॅप्सवर खर्च करतात. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संभाषण कमी होऊन अॅप्सवर जिव्हाळा अडकून पडला आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रत्येक गोष्टी,आवडी-निवडी, क्लासेस,मित्र, सवयी इत्यादी गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून वेळीच सावध होऊन आपल्या पाल्यावर चांगले संस्कार घडविल्यास  समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल.

 

'पालकांनी लहान मुलांना स्मार्टफोन देऊच नयेत जर आवश्यकता असेलच तर, साधा मोबाईल देने सोईस्कर ठरेल.स्मार्टफोन मुळे मूलं सोशल मीडियाच्या आहारी जातात ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होते.'

-सुनील भाबड (सहाय्यक पोलिस निरीक्षक, पिंपळनेर पोलिस स्टेशन)

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...